Join us  

मोठी बातमी! ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी पदापर्ण केलेल्या भारतीय गोलंदाजाच्या निवृत्तीची घोषणा

Vinay Kumar retirement: विनय कुमार याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द जास्त काळ राहिलेली नसली तरी स्थानिक क्रिकेटमध्ये त्याचं नाव आदरानं घेतलं जातं.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2021 3:43 PM

Open in App

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज विनय कुमार यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. कर्नाटकचं प्रतिनिधित्व करणाऱ्या विनय कुमार (Vinay Kumar) यानं आपल्या ट्विटर हँडलवर याबाबतची माहिती दिली आहे. (Vinay Kumar announces retirement from all forms of cricket)

विनय कुमार याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द जास्त काळ राहिलेली नसली तरी स्थानिक क्रिकेटमध्ये त्याचं नाव आदरानं घेतलं जातं. विनय कुमारच्या नेतृत्वात कर्नाटकच्या संघानं रणजी करंडक देखील जिंकलेला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विनय कुमारनं ४१ सामने खेळले असून यात ४९ विकेट्स घेतल्या आहेत. विनय कुमारच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर भारताचे माजी प्रशिक्षक आणि दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे यांनीही विनय कुमारचं कौतुक केलं आहे. 

विनय कुमार याने २०१० साली भारतीय संघात पदार्पण केलं होतं आणि त्याच सामन्यात रोहित शर्मानं आपलं पहिलंवहिलं एकदिवसीय शतक ठोकलं होतं. महत्वाची बाब अशी की विनय कुमार २०१३ साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध अखेरचा भारतीय संघाकडून निळ्या जर्सीत खेळताना दिसला आणि नेमकं याच सामन्यात रोहित शर्मानं वादळी द्विशतकी खेळी साकारली होती. दरम्यान, विनय कुमारसाठी वैयक्तिक पातळीवर त्याचा शेवटचा एकदिवसीय सामना काही खास ठरला नव्हता. ९ षटकांमध्ये त्यानं १०० हून अधिक धावा दिल्या होत्या.  

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघबीसीसीआयकर्नाटकभारत