रागाच्या भरात पाक बॅटरची ड्रेसिंग रुममध्ये आदळा-आपट; असं घडलं तरी काय? (VIDEO)

त्यानं जे कृत्य केले त्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगताना दिसत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 10:07 AM2024-09-17T10:07:50+5:302024-09-17T10:09:01+5:30

whatsapp join usJoin us
Pak Batter Imam Ul Haq Loses Cool After Being Dismissed In Pakistan Champions Cup Smashes Bat And Hurled Helmet Viral Cricket Video | रागाच्या भरात पाक बॅटरची ड्रेसिंग रुममध्ये आदळा-आपट; असं घडलं तरी काय? (VIDEO)

रागाच्या भरात पाक बॅटरची ड्रेसिंग रुममध्ये आदळा-आपट; असं घडलं तरी काय? (VIDEO)

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

पाकिस्तानमध्ये सध्या चॅम्पियन्स वनडे कप २०२४ स्पर्धा सुरु आहे. पाकमधील या देशांतर्गत स्पर्धेत  इमाम-उल-हक कमालीची कामगिरी करताना दिसत आहे. पण मंगळवारी झालेल्या मॅचनंतर विकेट गमावल्यावर त्याचा राग अनावर झाल्याचा सीन पाहायला मिळाला.  त्याने जे कृत्य केले त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

आधी बॅट फेकली, मग हेल्मेटवरही काढला राग

पँथर विरुद्धच्या सामन्यात अर्धशतक झळकवल्यानंतर त्याने आदळा आपट करत स्वत:च्या चुकीनंतर राग व्यक्त करताना दिसला. आधी त्याने बॅटवर राग काढला. मग हेल्मेटही फेकल्याचा सीन पाहायला मिळाला. इमामचे हे कृत्य कॅमेऱ्यात कैद झाले असून  हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होताना दिसतोय.

ऑफ स्टंपवरील चेंडू खेळण्याचा प्रयत्न फसला; विकेट किपरनं चूक न करता त्याला तंबूत धाडण्याचा डाव साधला
 

सलामीवीर फलंदाज इमाम यानं पाकिस्तानमधील देशांतर्गत स्पर्धेत शादाब खानच्या नेतृत्वाखालील पँथर्स संघा विरुद्ध खेळताना ६२ चेंडूत ६० धावांची दमदार खेळी केली. इमामचे लिस्ट ए कारिकिर्दीतील हे ३० वे अर्धशतक ठरले. पण शादाबनं  २३ व्या षटकातील आपल्या पहिल्याच चेंडूवर त्याचा खेळ खल्लास केला. इमामचा ऑफ स्टंपवरील चेंडूवर फटका मारण्याचा प्रयत्न केला. यात तो फसला आणि विकेटमागे उस्मान खान याने कोणतीही चूक न करता त्याचा झेल टिपला. विकेट गमावल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये पोहचताच इमामनं रागाने आधी बॅट आपटली. त्यानंतर हेल्मेट काढत ते बाजूला फेकले. मग डोक्याला हात लावून तो पश्चाताप करताना दिसला. 

इमामच्या संघाचा सलग दुसरा पराभव

या सामन्यात लायन्स संघाची सुरुवात खूपच खराब झाली. सज्जाद अली फक्त ६ धावा करून बाद झाला. दुसरीकडे अब्दुल्लाह शफीकनं फक्त एका धावेची भर घातली. संघाला सुरुवातीच्या धक्क्यातून सावरत इमामनं आधी ओमेर यूसुफच्या साथीनं २० धावांची भागीदारी रचली. मग त्याने  इरफानसोबत ३५ धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण हा प्रयत्न संघाला पराभवापासून काही वाचवू शकला नाही. पँथर्स संघाने या सामन्यात लायन्स संघाला ८४ धावांनी शह दिला. लायन्सची स्पर्धेतील हा सलग दुसरा पराभव ठरला. 

Web Title: Pak Batter Imam Ul Haq Loses Cool After Being Dismissed In Pakistan Champions Cup Smashes Bat And Hurled Helmet Viral Cricket Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.