Cricketer Died Due To Extreme Heat : क्रिकेटच्या मैदानात अनेकदा काही दुर्दैवी घटना घडत असतात. असाच एक धक्कादायक प्रकार सध्या ऑस्ट्रेलियातील क्रिकेटच्या मैदानात घडल्याचे समोर आले आहे. ऑस्ट्रेलियातील अॅडिलेडच्या मैदानात पाकिस्तानी वंशाच्या क्रिकेटरचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलीये. मैदानात फलंदाजी करत असताना जुनैद जफर खान नावाचा क्रिकेटरनं आपला जीव गमावलाय. कडाक्याच्या उन्हात खेळणं त्याच्या जीवावर बेतल्याची माहिती समोर येत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
४० षटके क्षेत्ररक्षण केल्यावर तो फलंदाजीसाठी उतरला होता मैदानात, अन्...
अॅडिलेडच्या कॉनकॉर्डिया कॉलेजच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात ओल्ड कॉनकॉर्डियन्स क्रिकेट क्लबकडून जुनैद मैदानात उतरला होता. प्रिन्स अल्फ्रेड ओल्ड कॉलेजियन्स विरुद्धच्या सामन्यात आधी त्याने ४० षटके क्षेत्ररक्षण केले. त्यानंतर फलंदाजी करताना ही घटना घडली. वैयक्तिक १६ धावांवर खेळत असताना तो अचानक मैदानात कोसळला अन् त्याचा मृत्यू झाला. ऑस्ट्रेलियन स्थानिक वेळेनुसार, दुपारी ४ वाजता ही घटना दुर्दैवी घटना घडली.
...अन् रमजानचा पवित्र महिन्यात कुटुंबियावर कोसळला दु:खाचा डोंगर
ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार, जुनैद खान २०१३ मध्ये पाकिस्तानातून ऑस्ट्रेलियात स्थलांतरित झाला होता. ऑस्ट्रेलियातील अॅडिलेड येथील एका आयटी कंपनीत तो काम करत होता. सध्याच्या घडीला मुस्लीम धर्मियांतील पवित्र मानला जाणारा रमजानचा महिना सुरु आहे. जुनैदनंही रोजा (उपवास) केला होता. त्यामुळे त्याने दिवसभर पाण्याचा एक थेंबही घेतला नव्हता. त्यात ४१.७ अंश सेल्सिअस तापमान त्याला झेपले नाही आणि ही दुर्दैवी घटना घडली, असा उल्लेख संबंधित वृत्तात करण्यात आला आहे. या घटनेमुळे त्याच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगरच कोसळला आहे.
Web Title: Pak Origin Cricketer Dies While Playing In Extreme Heat During Ramadan In Adelaide
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.