Ashton Agar’s partner receives death threat - ऑस्ट्रेलियाचा संघ १९९८नंतर प्रथमच पाकिस्तान दौऱ्यावर दाखल झाला आहे. येथे तीन कसोटी, तीन वन डे व एक ट्वेंटी-२० सामना ते खेळणार आहेत. पण, या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज अॅश्टन अॅगर याच्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. पतीला पाकिस्तान दौऱ्यावर पाठवू नकोस अन्यथा जीव घेतला जाईल, अशी धमकी अॅश्टन अॅगरची पत्नी मॅडेलीन हिला सोशल मीडियावरून देण्यात आली होती. क्रिकेट ऑस्ट्रेलिया ( CA) व पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) यांनी याचा तपास सुरू केला आहे.
४ मार्चपासून पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या पहिल्या कसोटीला रावळपिंडी येथे सुरुवात होणार आहे. The Sydney Morning Herald आणि The Age यांनी अॅश्टन अॅगरच्या पत्नीला धमकी मिळाल्याचे वृत्त प्रसिद्ध केले. ऑस्ट्रेलिया संघाच्या प्रवक्त्याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पण, हा बनावट इस्टाग्राम अकाऊंटवरून केलेला खोडसाळ पणा असल्याचे सांगण्यात येत आहे. हे अकाऊंट भारतातील असल्याचाही दावा केला गेला आहे. धमकी मिळूनही अॅश्टन अॅगर पाकिस्तान दौऱ्यावर आला आहे.
ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ - पॅट कमिन्स ( कर्णधार), अॅश्टन अॅगर, स्कॉट बोलंड, अॅलेक्स केरी, कॅमेरून ग्रीन, मार्कस हॅरीस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लियॉन, मिचेल मार्श्, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्क स्टेकेटी, मिचेल स्वेप्सन, डेव्हिड वॉर्नर, मिचेल नेसेर.
वेळापत्रक४ ते ८ मार्च पहिली कसोटी१२ ते १६ मार्च दुसरी कसोटी२१ ते २५ मार्च तिसरी कसोटी