पाकिस्तानने वन डे क्रिकेट मालिकेत श्रीलंकेवर 2-0 असा विजय मिळवला. कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत पार पडलेल्या या मालिकेत पाकिस्तानी खेळाडूंने वर्चस्व गाजवले. पण, क्षेत्ररक्षणात पाकिस्तानी खेळाडूंचा ढिसाळपणा पुन्हा एकदा दिसला आणि कॅमेरात कैद झालेला हा प्रसंग सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही लोटपोट व्हाल हे नक्की.. पाकिस्तानच्या खेळाडूंनं क्षेत्ररक्षण करताना चेंडू यष्टिरक्षकाकडे फेकण्याएवजी भलतीकडेच टाकला आणि त्यानंतर तो अडवण्यासाठी दोन खेळाडूंना मैदानावर लोटांगण घालावे लागले. बर इतकं करूनही चेंडू सीमापार जायचा तो गेलाच.
पाहा व्हिडीओ..
गौतम गंभीरने लगावला पाकिस्तानला टोला; काश्मीर आणि कराचीबाबत काय म्हणाला, पाहा व्हिडीओ...
नवी दिल्ली : भारताचा माजी सलामीवीर आणि विद्यमान खासदार गौतम गंभीरनेपाकिस्तानला चांगालाच टोला लगावला आहे. तुम्हाला कराची सांभाळता येत नाही आणि काश्मीबद्दल काय विचारता, असा सणसणीत टोलाही लगावला आहे. या सामन्याच्या वेळीचा एक व्हिडीओ गंभीरने आपल्या ट्विटरवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने पाकिस्तानची खिल्ली उडवली आहे.
पाकिस्तानमधील कराची येथे तब्बल दहा वर्षांनी पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळवला गेला. हा सामना पाकिस्तानने जिंकला. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करावा लागला. त्यानंतर झालेल्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने विजय मिळवला. गंभीरने आपल्या व्हिडीओवर लिहीले आहे की, " आतापर्यंत तुम्ही काश्मीरच्या नावाने बोबंलत होतात, जर तुमच्याच कराचीमधील अवस्था पाहा."
ना लाईट, ना प्रेक्षक... पाकिस्तानात 10 वर्षांनंतर असा खेळवला गेला आंतरराष्ट्रीय सामना
कराची नॅशनल स्टेडियमवर सोमवारी पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात आंतरराष्ट्रीय वन डे सामना खेळवण्यात आला. 2009नंतर प्रथमच या स्टेडियमवर झालेल्या आंतरराष्ट्रीय सामन्याला प्रेक्षकांची प्रचंड उपस्थिती असेल, असा अंदाज बांधला जात होता. पण, प्रत्यक्ष चित्र हे धक्कादायक होते. पाकिस्तान संघाने हा सामना 67 धावांनी जिंकला. या सामन्यादरम्यान दोनवेळा वीज गेली, त्यामुळे सामना काही काळ थांबवण्यात आला. पाकिस्तानच्या या आयोजनावरून चाहत्यांनी त्यांची चांगलीच फिरकी घेतली.
Web Title: PAK v SL 2019: WATCH - Pakistan fielders commit hilarious fielding blunder
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.