शेजाऱ्यांची लाज गेली! अफगाणिस्तानचा ऐतिहासिक विजय; ट्वेंटी-20 मालिकेत पाकिस्तानचा 'करेक्ट कार्यक्रम',

PAK vs AFG, 2nd T20I : सध्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात ट्वेंटी-20 मालिकेचा थरार रंगला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 12:30 PM2023-03-27T12:30:59+5:302023-03-27T12:31:39+5:30

whatsapp join usJoin us
PAK vs AFG Afghanistan create history by winning the second Twenty20 match and win the series against Pakistan for the first time  | शेजाऱ्यांची लाज गेली! अफगाणिस्तानचा ऐतिहासिक विजय; ट्वेंटी-20 मालिकेत पाकिस्तानचा 'करेक्ट कार्यक्रम',

शेजाऱ्यांची लाज गेली! अफगाणिस्तानचा ऐतिहासिक विजय; ट्वेंटी-20 मालिकेत पाकिस्तानचा 'करेक्ट कार्यक्रम',

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

pak vs afg t20 । शारजाह : सध्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात ट्वेंटी-20 मालिकेचा थरार रंगला आहे. मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून अफगाणिस्तानच्या संघाने इतिहास रचला असून मालिका आपल्या नावावर केली आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा संघ केवळ 92 धावा करू शकला होता, तर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानी संघाने 130 धावा केल्या. 131 धावांच्या सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानने शानदार खेळी केली अन् शारजाहच्या मैदानावर 7 गडी राखून विजय मिळवून अफगाणिस्तानने सामना जिंकला. 

दरम्यान, 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिले 2 सामने जिंकून अफगाणिस्तानने मालिका जिंकली आहे. अफगाणिस्तानकडून फजलहक फारूकी, नवीन-उल-हक, मुजीब उर्र रहमान, राशिद खान आणि करीम जनत यांनी गोलंदाजीत कमाल करून पाकिस्तानी फलंदाजांना घाम फोडला. बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांच्या गैरहजेरीत पाकिस्तानची फलंदाज पूर्णपणे ढासळल्याचे पाहायला मिळाले. 

20 धावांवर 3 गडी तंबूत 
बाबर आझम, मोहम्मद रिझवान आणि शाहीन आफ्रिदी यांच्या गैरहजेरीत खेळणारा पाकिस्तानचा संघ खूपच कमकुवत दिसत आहे. पाकिस्तानचा कर्णधार शादाब खानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर अफगाणिस्तानच्या फझलहक फारुकीने पाकिस्तानची टॉप ऑर्डर उद्ध्वस्त केली आणि सलामीवीर सॅम अयुबला बाद केले तर त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या अब्दुल्ला शफीकला बाद केले.  

अफगाणिस्तानचा ऐतिहासिक विजय 
पाकिस्तानने दिलेल्या 131 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानने सावध खेळी केली. सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानच्या संघाला 30 धावांवर पहिला झटका बसला. मात्र, सलामीवीर रहमानुल्लाह गुरबाजने 49 चेंडूत 2 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 44 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. अखेर अफगाणिस्तानने 19.5 षटकांत 3 बाद 133 धावा केल्या. पाकिस्तानकडून झमान खान आणि इहसानुल्लाला यांना प्रत्येकी 1-1 बळी घेता आला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 
 

Web Title: PAK vs AFG Afghanistan create history by winning the second Twenty20 match and win the series against Pakistan for the first time 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.