aus vs pak 1st odi match : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तानी संघाला पहिल्याच वन डे सामन्यात यजमानांनी कोंडीत पकडले. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघाने घातक मारा केला. पाकिस्तान क्रिकेट संघाला निर्धारित ५० षटकेदेखील खेळता आली नाहीत आणि ते ४६.४ षटकांत अवघ्या २०३ धावा करू शकले. कर्णधार मोहम्मद रिझवान (४४) वगळता एकाही पाकिस्तानी खेळाडूला साजेशी खेळी करता आली नाही. माजी कर्णधार बाबर आझमने (३७) धावा करुन डाव सावरण्याचा प्रयत्न केला मात्र त्यालाही मोठी खेळी करता आली नाही. मिचेल स्टार्कने सर्वाधिक (३) बळी घेऊन पाकिस्तानच्या फलंदाजीची कंबर मोडली. त्याच्याशिवाय पॅट कमिन्स (२), ॲडम झाम्पा (२), तर मार्नस लाबूशेन आणि सीन अबॉट यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.
दरम्यान, पाकिस्तानच्या डावातील एकोणिसाव्या षटकांत पॅट कमिन्स आणि कामरान गुलाम यांच्यात जुगलबंदी पाहायला मिळाली. एक चेंडू निर्धाव जाताच गुलामने कमिन्सची फिरकी घेतली, त्यावर कमिन्सने स्मित केले. पण, विशेष बाब म्हणजे त्याच्या पुढच्याच चेंडूवर कमिन्सने पाकिस्तानला मोठा धक्का देत गुलामला बाहेरचा रस्ता दाखवला. उसळी घेणाऱ्या कमिन्सच्या चेंडूने गुलामला चीतपट केले. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर या मालिकेतील सलामीचा सामना खेळवला जात आहे.
पाकिस्तानचा संघ -
मोहम्मद रिझवान (कर्णधार), अब्दुला शफीक, सैय अयुब, बाबर आझम, कामरान गुलाम, सलमान अली अघा, मोहम्मद इरफान खान, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हारिस रौफ, मोहम्मद हसनैन.
पाकिस्तानचा ऑस्ट्रेलिया दौरा
४ नोव्हेंबर, पहिला वन डे सामना
८ नोव्हेंबर, दुसरा वन डे सामना
१० नोव्हेंबर, तिसरा वन डे सामना
१४ नोव्हेंबर, पहिला ट्वेंटी-२० सामना
१६ नोव्हेंबर, दुसरा ट्वेंटी-२० सामना
१८ नोव्हेंबर, तिसरा ट्वेंटी-२० सामना
Web Title: pak vs aus 1st odi match updates pat Cummins wins the battle against Kamran Ghulam
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.