Pakistan vs Australia, 1st Test : १९९८सालानंतर पाकिस्तान दौऱ्यावर गेलेल्या ऑस्ट्रेलियन संघाची हालत खराब झाली आहे. यजमान पाकिस्तानने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेताना धावांचा डोंगर उभा केला. पण, कसोटीच्या दुसऱ्या दिवशी कर्णधार बाबर आजमच्या ( Babar Azam) विकेटने सर्वांचे लक्ष वेधले. ऑस्ट्रेलियाचा मधल्या फळीतील फलंदाज मार्नस लाबुशेनने डायरेक्ट थ्रो करताना बाबरला रन आऊट केले. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेही लाबुशेनच्या या कामगिरीचे कौतुक केले.
अब्दुल्लाह शफिक व इमान-उल-हक यांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. नॅथन लियॉनने पहिली विकेट मिळवली. शफिक ४४ धावांवर बाद झाला. त्यानंतर इमाम व अझर अली यांनी दोनशे धावांची भागीदारी केली. इमाम १५७ धावांवर, तर अझर अली १८५ धावांवर माघारी परतले. त्यानंतर आलेला कर्णधार बाबर मोठी खेळी करेल असे वाटले होते, परंतु तो ३६ धावांवर बाद झाला. पाकिस्तानला ४४२ धावांत चौथा धक्का बसला.