PAK vs AUS 1st Test : Rawalpindi च्या क्युरेटरला 'रस्ता' तयार करण्याची ऑफर; जाणून घ्या व्हायरल फोटोमागची गोष्ट

Pakistan vs Australia, 1st Test Rawalpindi : पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया यांच्यात रावळपिंडी येथील पहिली कसोटी ड्रॉ झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 05:42 PM2022-03-08T17:42:18+5:302022-03-08T17:46:41+5:30

whatsapp join usJoin us
PAK vs AUS 1st Test : Hey Pitch Rawalpindi Curator i wanna hire you for the construction of road near my house, netizens blast after test result draw  | PAK vs AUS 1st Test : Rawalpindi च्या क्युरेटरला 'रस्ता' तयार करण्याची ऑफर; जाणून घ्या व्हायरल फोटोमागची गोष्ट

PAK vs AUS 1st Test : Rawalpindi च्या क्युरेटरला 'रस्ता' तयार करण्याची ऑफर; जाणून घ्या व्हायरल फोटोमागची गोष्ट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Pakistan vs Australia, 1st Test Rawalpindi : पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया यांच्यात रावळपिंडी येथील पहिली कसोटी ड्रॉ झाली.  पाकिस्तानच्या पहिल्या डावातील ४ बाद  ४७६ धावांच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने ४५९ धावा केल्या. त्यानंतर पाकिस्तानने दुसऱ्या डावात बिनबाद २५२ धावा केल्या. अब्दुल्लाह शफिक १३६ आणि इमाम-उल-हक १११ धावांवर नाबाद राहिले. २४ वर्षांनंतर पाकिस्तान दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाविरुद्धच्या लढतीत कमालीची चुरस पाहायला मिळेल, अशी चाहत्यांना अपेक्षा होती. पण, इथे फक्त धावांचा पाऊस पडला. पाच दिवसांच्या खेळात ११८७ धावा झाल्या आणि फक्त १४ विकेट्स पडल्या. या खेळपट्टीमुळे चाहते संतापले अन् एकाने तर रावळपिंडीच्या क्युरेटरला त्याच्या घराशेजारील रस्त्याच्या कामाचे कंत्राट दिले. 


 पाकिस्तानने पहिला डाव ४ बाद  ४७६ धावांवर डाव घोषित केल्यानंतर ऑस्ट्रेलियानेही सडेतोड उत्तर दिले.  डेव्हिड वॉर्नर व उस्मान ख्वाजा यांनी पहिल्या विकेटसाठी १५६ धावांची विक्रमी भागीदारी केली. वॉर्नर ६८ धावांवर माघारी परतला. ख्वाजाला शतकाच्या उंबरठ्यावरून माघारी परतावे लागले. त्याने १५९ चेंडूंत १५ चौकारांच्या मदतीने ९७ धावा केल्या. ट्रेव्हिस हेड ( ८) लगेच बाद झाला. मार्नस लाबुशेनने १५८ चेंडूंत १२ चौकारांसह ९० धावांची खेळी केली. स्मिथ ७८, तर कॅमेरून ग्रीन ४८ धावांवर बाद झाले. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४५९ धावा केल्या.   

ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकाच कसोटीच्या दोन्ही डावांत शतकी भागीदारी करणारी ही पाचवी जोडी ठरली आहे. शिवाय एकाच कसोटीच्या तीन डावांत पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी होण्याची ही दुसरी वेळ ठरली. यापूर्वी ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात एडलेड ओव्हल येथे १९४६-४७ मध्ये खेळलेल्या कसोटीत असा पराक्रम झाला होता. 

रावळपिंडीच्या नावाने मीम्स...





 

Web Title: PAK vs AUS 1st Test : Hey Pitch Rawalpindi Curator i wanna hire you for the construction of road near my house, netizens blast after test result draw 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.