Pakistan vs Australia, 1st Test Rawalpindi : पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया यांच्यात रावळपिंडी येथील पहिली कसोटी ड्रॉ झाली. पाकिस्तानच्या पहिल्या डावातील ४ बाद ४७६ धावांच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने ४५९ धावा केल्या. त्यानंतर पाकिस्तानने दुसऱ्या डावात बिनबाद २५२ धावा केल्या. अब्दुल्लाह शफिक १३६ आणि इमाम-उल-हक १११ धावांवर नाबाद राहिले. २४ वर्षांनंतर पाकिस्तान दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाविरुद्धच्या लढतीत कमालीची चुरस पाहायला मिळेल, अशी चाहत्यांना अपेक्षा होती. पण, इथे फक्त धावांचा पाऊस पडला. पाच दिवसांच्या खेळात ११८७ धावा झाल्या आणि फक्त १४ विकेट्स पडल्या. या खेळपट्टीमुळे चाहते संतापले अन् एकाने तर रावळपिंडीच्या क्युरेटरला त्याच्या घराशेजारील रस्त्याच्या कामाचे कंत्राट दिले.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकाच कसोटीच्या दोन्ही डावांत शतकी भागीदारी करणारी ही पाचवी जोडी ठरली आहे. शिवाय एकाच कसोटीच्या तीन डावांत पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी होण्याची ही दुसरी वेळ ठरली. यापूर्वी ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात एडलेड ओव्हल येथे १९४६-४७ मध्ये खेळलेल्या कसोटीत असा पराक्रम झाला होता.
रावळपिंडीच्या नावाने मीम्स...