PAK vs AUS, 2nd Test : स्वतःच्याच चक्रव्यूहात अडकला पाकिस्तान; ऑस्ट्रेलियाचा जबरदस्त पलटवार पाहून फॅन्स कोमात, Video

PAK vs AUS, 2nd Test : दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील ९ बाद ५५६ धावांच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानची वाट लागली.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 04:54 PM2022-03-14T16:54:48+5:302022-03-14T17:03:09+5:30

whatsapp join usJoin us
PAK vs AUS, 2nd Test : Pakistan bowled out for 148 against Australia in reply of Australia's 556, Fans can't believe it Video  | PAK vs AUS, 2nd Test : स्वतःच्याच चक्रव्यूहात अडकला पाकिस्तान; ऑस्ट्रेलियाचा जबरदस्त पलटवार पाहून फॅन्स कोमात, Video

PAK vs AUS, 2nd Test : स्वतःच्याच चक्रव्यूहात अडकला पाकिस्तान; ऑस्ट्रेलियाचा जबरदस्त पलटवार पाहून फॅन्स कोमात, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

PAK vs AUS, 2nd Test : दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील ९ बाद ५५६ धावांच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानची वाट लागली. फलंदाजीला पोषक खेळपट्टी तयार करून पाहुण्या ऑस्ट्रेलियाची कोंडी करण्याचा डाव पाकिस्तानवरच उलटला. पाकिस्तानचा पहिला डाव ऑस्ट्रेलियाने १४८ धावांवर गुंडाळून ४०८ धावांची आघाडी घेतली आहे. पाकिस्तानची ही अवस्था पाहून चाहतेही कोमात गेले आहेत. 

 
ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात स्टीव्ह स्मिथने २१४ चेंडूंत ७२ धावांची खेळी केली.  सलामीवीर उस्मान ख्वाजाने शतकी खेळी करताना संघाला पहिल्या दिवसअखेर ४ बाद ३३० धावा उभारून दिल्या होत्या. दुसऱ्या दिवशी ख्वाजा ३६९ चेंडूंत १५ चौकार व १ षटकारासह १६० धावांवर बाद झाला. नॅथन लियॉन ( ३८), ट्रॅव्हिस हेड ( २३), कॅमेरून ग्रीन ( २८), डेव्हिड वॉर्नर ( ३६) यांना मोठी खेळी करता आली नाही. अॅलेक्स केरी ९३ धावांवर बाद झाला. कर्णधार पॅट कमिन्स ३४ धावांवर नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाने पहिला डाव ९ बाद ५५६ धावांवर घोषित केला.

प्रत्युत्तरात, पाकिस्तानचे अब्दुल्लाह शफिक ( १३) व इमाम-उल-हक( २०) हे झटपट माघारी परतले. पाटा विकेटवर रन आऊट झाला म्हणून शफिकचेही वाभाडे निघाले. अझर अली ( १४), फवाद आलम ( ०), मोहम्मद रिझवान ( ६), फहीम अशरफ ( ४) व साजीद खान ( ५) हे मिचेल स्टार्क व पॅट कमिन्सच्या भेदक माऱ्यासमोर ढेपाळले. पाकिस्तानचे पाच फलंदाज ३७ धावांत माघारी परतल्यानं त्यांची अवस्था ७ बाद १०० अशी झाली आहे. नौमान अलीने नाबाद २० धावा केल्या. पाकिस्तानचा पहिला डाव १४८ धावांवर गुंडाळून ऑस्ट्रेलियाने ४०८ धावांची आघाडी घेतली. मिचेल स्टार्कने ३, मिचेल स्वेपसनने दोन विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियाने फॉलो ऑन न देता पुन्हा फलंदाजीला येण्याचा निर्णय घेतला. 

 
 

Web Title: PAK vs AUS, 2nd Test : Pakistan bowled out for 148 against Australia in reply of Australia's 556, Fans can't believe it Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.