PAK vs AUS, 2nd Test : दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील ९ बाद ५५६ धावांच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानची वाट लागली. फलंदाजीला पोषक खेळपट्टी तयार करून पाहुण्या ऑस्ट्रेलियाची कोंडी करण्याचा डाव पाकिस्तानवरच उलटला. पाकिस्तानचा पहिला डाव ऑस्ट्रेलियाने १४८ धावांवर गुंडाळून ४०८ धावांची आघाडी घेतली आहे. पाकिस्तानची ही अवस्था पाहून चाहतेही कोमात गेले आहेत.
प्रत्युत्तरात, पाकिस्तानचे अब्दुल्लाह शफिक ( १३) व इमाम-उल-हक( २०) हे झटपट माघारी परतले. पाटा विकेटवर रन आऊट झाला म्हणून शफिकचेही वाभाडे निघाले. अझर अली ( १४), फवाद आलम ( ०), मोहम्मद रिझवान ( ६), फहीम अशरफ ( ४) व साजीद खान ( ५) हे मिचेल स्टार्क व पॅट कमिन्सच्या भेदक माऱ्यासमोर ढेपाळले. पाकिस्तानचे पाच फलंदाज ३७ धावांत माघारी परतल्यानं त्यांची अवस्था ७ बाद १०० अशी झाली आहे. नौमान अलीने नाबाद २० धावा केल्या. पाकिस्तानचा पहिला डाव १४८ धावांवर गुंडाळून ऑस्ट्रेलियाने ४०८ धावांची आघाडी घेतली. मिचेल स्टार्कने ३, मिचेल स्वेपसनने दोन विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियाने फॉलो ऑन न देता पुन्हा फलंदाजीला येण्याचा निर्णय घेतला.