Join us  

Shoaib Akhtar, PAK vs AUS: शोएब अख्तरनेच काढली पाकिस्तानी संघाची लाज! ट्रोल करत म्हणाला "आता मजा येतेय का?"

असं झालं तर पाकिस्तानात कोणीही खेळायला येणार नाही, असंही अख्तर म्हणाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 6:07 PM

Open in App

Shoaib Akhtar slams Pakistan, PAK vs AUS 2nd test: पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात पाहुण्यांनी यजमानांची दाणादाण उडवली. ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या डावात ५५६ धावांवर डाव घोषित केला. त्यानंतर बाबर आझमच्या पाकिस्तानी संघाला घरच्या मैदानावर दीडशे धावांचा टप्पा देखील गाठता आला नाही. पाक चा डाव अवघ्या १४८ धावांमध्ये आटोपला. पाकिस्तानच्या फलंदाजांची अतिशय वाईट कामगिरी पाहता माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने पाकिस्तानी संघाची अक्षरशः लाज काढली. तसेच एक ट्वीट करून पाक खेळाडूंची खिल्ली उडवली.

ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी पहिल्या कसोटी सामन्यात केवळ चार बळी टिपले होते. त्यातच ऑस्ट्रेलियन संघाचा पहिला डावही मोठ्या धावसंख्येचा होता. अशा परिस्थितीमध्ये पाकिस्तानी संघाची फलंदाजीत अशी अवस्था होईल याचा कोणालाच अंदाज नव्हता. पण ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत पाक फलंदाजांची तारांबळ उडवली. त्यामुळे एक वेळ अशी आली की शकत गाठण्यासाठी त्यांना ७ गड्यांचा मोबदला द्यावा लागला. यावरून शोएब अख्तर ने पाक संघाची लाजच काढली. आता सगळ्यांना मजा आली. माझ्यासह साऱ्यांचा कंटाळा दूर झाला. पाकिस्तान ची १०० धावांमध्ये ७ बळी ही अवस्था पाहून मजा आली का?, असा खोचक सवाल तिने केला.

अख्तरनेही पाकिस्तान संघाच्या दृष्टिकोनावरूनही टीका केली. 'तुम्ही घाबरून खेळता तेव्हा असं होतं', असं तो पाकिस्तानी संघाला म्हणाला. कराची कसोटीत पाकिस्तान संघाची फलंदाजी ऑस्ट्रेलियन गोलंदाजीसमोर फिकी पडल्याचं दिसलं. 'रावळपिंडी एक्स्प्रेस' या नावाने प्रसिद्ध असलेल्या शोएब अख्तरने कराची आणि रावळपिंडीच्या पिचवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले, "अशा प्रकारच्या पिचवर खेळलो तर पाकिस्तानात कोणीही खेळायला येणार नाही." पहिल्या कसोटीतील पिचवरून बरीच टीका झाली होती.

टॅग्स :शोएब अख्तरपाकिस्तानआॅस्ट्रेलियाबाबर आजम
Open in App