Join us  

WTC points table 2021-23: टीम इंडियाचा कसोटी वर्ल्ड कप फायनल गाठण्याचा मार्ग सोपा झाला; पाकिस्तानचा पराभव Rohit Sharmaसाठी फायद्याचा ठरला

Pakistan vs Australia, 3rd Test : ऑस्ट्रेलियाने कराची कसोटी ११५ धावांनी जिंकून पाकिस्तानविरुद्धची तीन सामन्यांची मालिका १-० अशी खिशात घातली.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 5:35 PM

Open in App

Pakistan vs Australia, 3rd Test : ऑस्ट्रेलियाने कराची कसोटी ११५ धावांनी जिंकून पाकिस्तानविरुद्धची तीन सामन्यांची मालिका १-० अशी खिशात घातली. १९९८नंतर पाकिस्तान दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलियाने आजचा सामना जिंकून २४ वर्षांपूर्वीच्या निकालाची पुनरावृत्ती केली. विजयासाठी ठेवलेल्या ३५१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संपूर्ण संघ २३५ धावांवर तंबूत परतला. नॅथन लियॉनने ( Nathan Lyon) पाच, कर्णधार पॅट कमिन्सने तीन विकेट्स घेतल्या. या मालिकेत १६५.३३च्या सरासरीने सर्वाधिक ४९६ धावा करणाऱ्या उस्मान ख्वाजाला ( Usman Khawaja) Player for the Series म्हणून गौरविण्यात आले. ऑस्ट्रेलियाने या विजयासह जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वल स्थान मजबूत केले अन् त्याचा फायदा भारताला झाला. 

ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव ३  बाद २२७ धावांवर घोषित करून पाकिस्तानसमोर विजयासाठी ३५१ धावांचे लक्ष्य ठेवले.  प्रत्युत्तरात पाकिस्तानने ५ फलंदाज १६७ धावांवर गमावले होते इमाम-उल-हक ७० धावा करून माघारी परतला. अब्दुल्लाह शफिक ( २७), अझर  अली  ( १७), फवाद आलम ( ११), मोहम्मद रिझवान ( ०) हे अपयशी ठरले.  कर्णधार बाबर आजम ( ५५)  व साजिद खान यांनी पाकिस्तानचा संघर्ष सुरू ठेवला होता, परंतु नॅथन लियॉनच्या गोलंदाजीवर स्टीव्ह स्मिथने स्लीपमध्ये भारी कॅच घेतला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा डाव झटपट गुंडाळला. 

  • २०११नंतर ऑस्ट्रेलियाने आशियाई देशामध्ये मिळवलेला हा पहिला कसोटी मालिका विजय ठरला. त्यांनी २०११मध्ये श्रीलंकेविरुद्ध १-० अशी मालिका जिंकली होती. 
  • पाकिस्तानातील ऑस्ट्रेलियातील हा तिसरा कसोटी मालिका विजय आहे. याआधी २९५९-६०मध्ये रिची बेनॉड यांच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने २-० अशी मालिका जिंकली होती. त्यानंतर मार्क टेलरच्या नेतृत्वाखाली १९९८-९९मध्ये १-० असा मालिका विजय मिळवला होता.  

 

WTC 2021-23 गुणतालिकेत भारत कितव्या क्रमांकावर?पाकिस्तान- ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघ WTC points table 2021-23 मध्ये चौथ्या क्रमांकावर होता.  ऑस्ट्रेलिया ( ७७.७७), पाकिस्तान ( ६६.६६) आणि दक्षिण आफ्रिका ( ६०.००) हे भारताच्या पुढे होते. आजच्या निकालाने भारतीय संघ तिसऱ्या क्रमांकावर सरकला आहे. पाकिस्तानची चौथ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. 

WTC मध्ये भारताचे पुढील सामने

  • भारताचे आता एकूण  ७ सामने शिल्लक आहेत. १ जुलैला भारत बर्मिंगहॅम येथे इंग्लंडविरुद्ध स्थगित झालेली कसोटी खेळणार आहे. त्यानंतर घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यानंतर दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे.  
  • भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध २-० अशी मालिका जिंकेल असा अंदाज आहे. उर्वरित पाच कसोटींमध्ये ( ४ वि. ऑस्ट्रेलिया व १ वि. इंग्लंड) भारताला किमान तीन कसोटी जिंकाव्या लागतील व १ ड्रॉ राखावी लागेल.  
टॅग्स :जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धापाकिस्तानआॅस्ट्रेलियाभारतीय क्रिकेट संघ
Open in App