Pakistan vs Australia, 3rd Test : ऑस्ट्रेलियाने विजयासाठी ठेवलेल्या ३५१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना यजमान पाकिस्तानचा निम्मा संघ १६७ धावांवर माघारी परतला आहे. कसोटीच्या पाचव्या दिवशी पाकिस्तानी अम्पायर्सनेच यजमानांना हरवण्याचा विडा उचलल्याचे पाहायला मिळत आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या अपीलवर अम्पायर बाद असल्याचा निर्णय देत आहेत आणि असाच एक निर्णय सध्या वादात अडकला आहे. पाकिस्तानी फलंदाज अझर अली ( Azhar Ali) याला वादग्रस्त निकालामुळे बाद व्हावे लागले.
पाकिस्तानच्या दुसऱ्या डावातील ४६व्या षटकात हा निर्णय घेतला गेला. अझरचा स्वीप शॉट मारण्याचा प्रयत्न फसला अन् चेंडू पहिल्या स्लीपमध्ये उभ्या असलेल्या स्टीव्ह स्मिथने सहज टिपला. चेंडू बॅटची किनार घेत पॅडवर आदळून स्मिथच्या हाती विसावला होता आणि तरीही मैदानावरील अम्पायरने अझर अलीला नाबाद दिले. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने या विरोधात तिसऱ्या पंचाकडे दाद मागितली. त्यात अल्ट्रा एजमध्ये चेंडू व बॅट यांचा संपर्क झाल्याचे हलकेसे दिसत होते आणि अम्पायरने त्याला बाद जाहीर केले. पण, चाहत्यांच्या मते चेंडू व बॅट यांचा संपर्क झाला नव्हता आणि आता त्यावरून वाद सुरू आहे.
पाहा व्हिडीओ...