Pakistan vs Australia, 3rd Test Live : पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातली तिसरी कसोटी लाहोर येथे खेळवण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियाने समाधानकारक धावसंख्येच्या दिशेने वाटचाल केली आहे. पण, या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी एक विचित्र प्रकार पाहायला मिळाला. पाकिस्तानी अम्पायर अलीम दार ( Aleem Dar) यांनी ऑसी फलंदाज अॅलेक्स कैरीला ( Alex Carey) बाद दिले, परंतु तो झेलबाद झाला की LBW हेच त्यांना कळाले नाही. रिप्लेमध्ये तर विचित्रच प्रकार समोर आला आणि सर्वांनी डोक्यावर हात मारला.
पहिल्या दोन कसोटी ड्रॉ राहिल्यानंतर तिसऱ्या कसोटीत चुरस पाहायला मिळणे अपेक्षित आहे. डेव्हिड वॉर्नर ( ७) व मार्नस लाबुशेन ( ०) यांना शाहिन शाह आफ्रिदीने पहिल्याच दिवशी चालते केले. त्यानंतर उस्मान ख्वाजा व स्टीव्ह स्मिथ यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी १३८ धावा जोडल्या. स्मिथ ५९ धावांवर माघारी परतल्यानंतर ट्रॅव्हीस हेडने ( २९) ख्वाजाला साथ दिली. ख्वाजा शतकाच्या उंबरठ्यावरून माघारी परतला. त्याने २१९ चेंडूंत ९ चौकार व १ षटकारासह ९१ धावा केल्या.
कॅमेरून ग्रीन व अॅलेक्स कैरी या जोडीनं सहाव्या विकेटसाठी शतकी भागीदारी करताना ऑस्ट्रेलियाला कमबॅक करून दिले. यांची भागीदारी सुरू असताना हा विचित्र प्रकार घडला. पाकिस्तानी गोलंदाज हसन अली याने टाकलेला भन्नाट यॉर्कर स्टम्प्सला घासून गेला, परंतु बेल्स न पडल्याने कैरी बाद झाला नाही. पण, पाकिस्तानी खेळाडूंच्या जोरदार अपीलवर अम्पायर अलीम दार यांनी कैरीला बाद दिले. मात्र, त्याला झेलबाद द्यावं की LBW हा निर्णय घेण्यासाठी तिसऱ्या अम्पायरची मदत घेतली गेली अन् समोर वेगळंच चित्र आलं...
पाहा व्हिडीओ...