PAK vs AUS: आफ्रिदीचा स्विंग, वॉर्नर फसला पण पाकिस्तानचीच फजिती; शेजाऱ्यांची भन्नाट फिल्डिंग

Abdullah Shafique Misfield: तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकून यजमान ऑस्ट्रेलियाने १-० अशी आघाडी घेतली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 12:51 PM2023-12-26T12:51:26+5:302023-12-26T12:51:59+5:30

whatsapp join usJoin us
PAK vs AUS Boxing Day Test David Warner could have been dismissed by Pakistan's Shaheen Afridi but Abdula Shafiq dropped a quick catch, watch the video  | PAK vs AUS: आफ्रिदीचा स्विंग, वॉर्नर फसला पण पाकिस्तानचीच फजिती; शेजाऱ्यांची भन्नाट फिल्डिंग

PAK vs AUS: आफ्रिदीचा स्विंग, वॉर्नर फसला पण पाकिस्तानचीच फजिती; शेजाऱ्यांची भन्नाट फिल्डिंग

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

PAK vs AUS Boxing Day Test। मेलबर्न : पाकिस्तानी संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून तिथे आजपासून मेलबर्न येथे बॉक्सिंग डे कसोटी सामना खेळवला जात आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकून यजमान ऑस्ट्रेलियाने १-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे दुसरा सामना शेजाऱ्यांसाठी 'करा किंवा मरा' असा आहे. पाकिस्तानी संघाचे क्षेत्ररक्षण जगजाहीर आहे, त्यांच्या खराब फिल्डिंगमुळे त्यांनी नेहमी ट्रोल केले जाते. मेलबर्न येथे होत असलेल्या सामन्यात देखील पाकिस्तानने आपल्या खराब क्षेत्ररक्षणाचा दाखला दिला. शाहीन शाह आफ्रिदीने अप्रतिम चेंडू टाकून डेव्हिड वॉर्नरला आपल्या जाळ्यात फसवले होते, पण यष्टीरक्षकाच्या बाजूला उभा असलेल्या अब्दुला शफीकने सोपा झेल सोडला अन् वॉर्नरला जीवनदान मिळाले. 

हा झेल सुटल्यानंतर वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा यांनी पहिल्या बळीसाठी ९० धावांची भागीदारी नोंदवली. डेव्हिड वॉर्नर ३८ धावा करून बाद झाला. एकूणच पाकिस्तानच्या खराब क्षेत्ररक्षणामुळे ऑस्ट्रेलियन संघाने चांगली सुरूवात केली. 

यजमानांची १-० ने आघाडी 
तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकून यजमान ऑस्ट्रेलियाने विजयी सलामी दिली आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानला तब्बल ३६० धावांनी पराभव पत्करावा लागला. लक्षणीय बाब म्हणजे मागील २८ वर्षांमध्ये पाकिस्तानला एकदाही ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर विजय मिळवता आला नाही. 

Web Title: PAK vs AUS Boxing Day Test David Warner could have been dismissed by Pakistan's Shaheen Afridi but Abdula Shafiq dropped a quick catch, watch the video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.