Mitchell Starc, PAK vs AUS: अरे देवा... Pakistan संघावर आली लाजिरवाणी वेळ! घरच्या मैदानावर अवघ्या २० धावांत गमावले ७ बळी; मिचेल स्टार्कने केला भेदक मारा

पाकिस्तानच्या फलंदाजांची घरच्या मैदानावरच घसरगुंडी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 07:11 PM2022-03-23T19:11:33+5:302022-03-23T19:11:48+5:30

whatsapp join usJoin us
PAK vs AUS Pakistan cricket team led by Babar Azam embarrassing performance as they lost 7 wickets in 20 runs Mitchell Starc superb bowling pat cummins | Mitchell Starc, PAK vs AUS: अरे देवा... Pakistan संघावर आली लाजिरवाणी वेळ! घरच्या मैदानावर अवघ्या २० धावांत गमावले ७ बळी; मिचेल स्टार्कने केला भेदक मारा

Mitchell Starc, PAK vs AUS: अरे देवा... Pakistan संघावर आली लाजिरवाणी वेळ! घरच्या मैदानावर अवघ्या २० धावांत गमावले ७ बळी; मिचेल स्टार्कने केला भेदक मारा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Mitchell Starc, PAK vs AUS: ऑस्ट्रेलियाविरूद्ध (Australia) सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटीत पाकिस्तानी (Pakistan) संघाच्या फलंदाजांनी चाहत्यांना निराश केले. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३९१ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यास प्रत्युत्तर देताना पाकिस्तानचा संघ द्विशतकी मजल मारेपर्यंत चांगल्या स्थितीत होता, पण नंतर धडाधड फलंदाज बाद झाल्याने संघाचा डाव २६८ धावांवर आटोपला. घरच्या मैदानावर पाकिस्तानी संघाचा डाव कोलमडला. विशेष म्हणजे, काही क्षण आधी भक्कम स्थितीत असलेल्या पाकिस्तानच्या संघाने पुढील अवघ्या २० धावांत ७ गडी गमावले.

ऑस्ट्रेलियाच्या संघाने पहिल्या डावात उस्मान ख्वाजा (९१), कॅमेरॉन ग्रीन (७९) आणि स्टीव्ह स्मिथ (५९) या तिघांच्या अर्धशतकांच्या जोरावर ३९१ धावांपर्यंत मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्ताची पहिली विकेट लवकर गेली. पण अब्दुला शफीक (८१) आणि अझर अली (७८) या दोघांनी १५० धावांची तगडी भागीदारी केली. त्यानंतर बाबर आझमनेही ६७ धावा केल्या. त्यामुळे पाकिस्तानची अवस्था ३ बाद २४८ होती. पण त्यानंतर सामना पूर्णपणे पलटला आणि पाकिस्तानचा डाव २६८ धावांत आटोपला.

बाबर आझम, मोहम्मद रिझवान आणि फवाद आलम या तिघांना मिचेल स्टार्कने माघारी धाडलं. तर, आधीच दोन बळी टिपलेल्या पॅट कमिन्सने साजीद खान, नौमन अली आणि हसन अली या तिघांना बाद करत बळींचा 'पंजा' पूर्ण केला. अखेर स्टार्कने नसीम शाहचा त्रिफळा उडवला पाकिस्तानचा डाव संपवला. त्यामुळे घरच्याच मैदानावर २० धावांत ७ गडी गमवायची वेळ पाकिस्तानवर ओढवली.

Web Title: PAK vs AUS Pakistan cricket team led by Babar Azam embarrassing performance as they lost 7 wickets in 20 runs Mitchell Starc superb bowling pat cummins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.