ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना उद्यापासून मेलबर्नमध्ये 26 डिसेंबरपासून खेळवला जाणार आहे. बॉक्सिंग डे कसोटीपूर्वी दोन्ही संघांनी प्लेइंग-11 जाहीर केले आहेत. पॅट कमिन्सने त्याच 11 खेळाडूंसोबत जाण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियन संघाच्या प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तर पाकिस्तानने 12 खेळाडूंची निवड केली आहे.
दुसऱ्या कसोटीसाठी पाकिस्तानने आपल्या प्लेइंग-11 मध्ये बरेच बदल केले आहेत. सर्वात मोठा बदल म्हणजे माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज सर्फराज अहमदला अवघ्या एका सामन्यानंतर बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्याच्या जागी मोहम्मद रिझवानचा प्लेइंग-11 मध्ये समावेश करण्यात आला आहे.
यामागचे कारण स्पष्ट करताना कर्णधार शान मसूद म्हणाला की, संघ व्यवस्थापनाचा असा विश्वास आहे की सर्फराज थोडा ब्रेक घेऊन लयीत परत येऊ शकतो. बॉक्सिंग डे कसोटीसाठी पाकिस्तानने एकूण १२ खेळाडूंची निवड केली आहे. वेगवान गोलंदाज खुर्रम शेहजाद बरगडीच्या दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे.
पाकिस्तान- इमाम-उल-हक, अब्दुल्ला शफीक, शान मसूद (कर्णधार), बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सलमान अली आगा, शाहीन आफ्रिदी, हसन अली, मीर हमजा, आमिर जमाल, साजिद खान.
ऑस्ट्रेलिया- डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (कर्णधार), नॅथन लियॉन, जोश हेझलवूड.