पाकिस्तानी संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून, तिथे तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. १४ डिसेंबरपासून मालिकेला सुरूवात होणार आहे. मालिका तोंडावर असतानाच खेळपट्टीवरून वाद रंगला आहे. कॅनबेरा येथे झालेला सराव सामना अनिर्णित करण्यात यजमानांना यश आले. पण, पाकिस्तानच्या मोहम्मद हफिजने खेळपट्टीवर प्रश्न उपस्थित करून भीती व्यक्त केली होती. सलामीचा सामना पर्थ येथे होणार असून, याचाच दाखला देत नेटकरी भन्नाट मीम्स व्हायरल करून पाकिस्तानची फिरकी घेत आहेत.
दरम्यान, पर्थ येथे होणारा पहिला सामना ज्या खेळपट्टीवर होणार आहे, त्याचे फोटो समोर आले आहेत. यावरून नेटकऱ्यांनी शेजाऱ्यांची खिल्ली उडवली. नवनिर्वाचित कर्णधार शान मसूदच्या नेतृत्वात प्रथमच पाकिस्तानी संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला आहे. वन डे विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने संघरचनाच बदलली. बाबर आझमने कर्णधारपद सोडल्यानंतर शान मसूदकडे कसोटी संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले. तर, शाहीन शाह आफ्रिदीकडे ट्वेंटी-२० संघाची धुरा दिली गेली.
पाकिस्तानविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ -पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलंड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरून ग्रीन, जोश हेझलवुड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबूशेन, नाथन लायन, मिचेल मार्श, लॉन्स मॉरिस, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर.
ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी पाकिस्तानी संघ -शान मसूद (कर्णधार), आमिर जमाल, अब्दुला शफिक, अबरार अहमद, बाबर आझम, फरिम अश्रफ, हसन अली, इमाम-उल-हक, खुर्राम शेहजाद, मीर हमझा, मोहम्मद रिझवान, नौमान अली, मोहम्मद वसिम ज्युनियर, सैय्य अयुब, सलमान अली आघा, सरफराज अहमद, सौद शकील, शाहीन शाह आफ्रिदी.
पाकिस्तान विरूद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचे वेळापत्रक
- पहिला सामना - १४ ते १८ डिसेंबर (पर्थ स्टेडियम)
- दुसरा सामना - २६ ते ३० डिसेंबर (मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड)
- तिसरा सामना - ३ ते ७ जानेवारी (सिडनी क्रिकेट ग्राऊंड)