Join us  

एक चूक अन् पाकिस्तानी खेळाडूंना भरावा लागेल १.४ लाखाचा दंड; PCBने लागू केला नवा नियम

सध्या पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 2:53 PM

Open in App

नवी दिल्ली : सध्या पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे. पहिला सामना जिंकून यजमान ऑस्ट्रेलियाने विजयी सलामी दिली आहे. शेजाऱ्यांना पहिल्या सामन्यात ३६० धावांनी दारूण पराभवाचा सामना करावा लागला. अशातच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तानी खेळाडूंची पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने डोकेदुखी वाढवल्याचे दिसते. कारण राष्ट्रीय संघाचा संचालक मोहम्मद हाफीजने घातलेल्या कठोर नियमांमुळे पाकिस्तानी खेळाडू निराश दिसत आहेत. आज पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस आहे. 

पाकिस्तानातील माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, हाफिजने कठोर मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत ज्या अंतर्गत अनेक नियमांचे पालन करावे लागणार आहे. मैदानावर खेळाडूंनी आळशीपणा दाखवल्यास कठोर कारवाई केली जाईल असा इशारा त्याने दिला. याशिवाय सामन्यादरम्यान एखादा खेळाडू सक्रिय नसल्यास त्याला दंड आकारला जाऊ शकतो. पाकिस्तानी रूपयानुसार सामन्यात शंभर टक्के योगदान न दिल्यास १.४ लाख रूपयांचा दंड भरावा लागणार आहे. या नियमांमागील उद्देश खेळाडूंमध्ये शिस्तीची भावना निर्माण करणे हा आहे, परंतु काही खेळाडूंनी निराशा व्यक्त केली आहे.

पाकिस्तानी संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर वन डे विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर पाकिस्तानी संघात अनेक बदल पाहायला मिळाले. बाबर आझमने कर्णधारपद सोडल्यानंतर शान मसूदकडे कसोटी संघाची धुरा सोपवण्यात आली. तर, शाहीन आफ्रिदी ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार बनला. संघाशिवाय पाकिस्तान क्रिकेट बोर्डात देखील अनेक बदल झाले. मुख्य निवडकर्ता म्हणून वहाब रियाजची निवड झाली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अनेक बदल करून देखील शेजाऱ्यांनी निराशाजनक कामगिरी करताना ऑस्ट्रेलियाविरूद्धचा पहिला सामना गमावला. त्यामुळे संघ व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

दुसऱ्या कसोटीसाठी पाकिस्तानी संघ - शान मसूद (कर्णधार), इमाम-उल-हक, अब्दुल्ला शफीक, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सलमान अली आगा, शाहीन आफ्रिदी, हसन अली, मीर हमजा, आमिर जमाल, साजिद खान.

दुसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ -पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, जोश हेझलवूड.

टॅग्स :पाकिस्तानआॅस्ट्रेलियाबाबर आजम