PAK vs BAN 1st Test : आजपासून पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होत आहे. मंगळवारी रात्री रावळपिंडी येथे जोरदार पाऊस झाल्याने पहिल्या सामन्यात व्यत्यय आला. मैदान भिजल्याने आणि खेळपट्टीवर पाणी साचल्याने सामना वेळेत सुरू होऊ शकला नाही. १२ वाजता सामना सुरू होईल असे अपेक्षित होते, मात्र तसे झाले नाही. विशेष बाब म्हणजे मागील तीन तासांपासून पाऊस उघडला असताना देखील सामना सुरू न झाल्याने चाहत्यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची फिरकी घेतली. खरे तर आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद सांभाळणाऱ्या पाकिस्तानला कुठेतरी चपराक बसल्याचे दिसते.
२१ ऑगस्टपासून पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात कसोटी मालिका खेळवली जात आहे. शान मसूदच्या नेतृत्वातील पाकिस्तानी संघ आपल्या पहिल्या विजयाच्या शोधात आहे. याआधी मसूदच्या नेतृत्वात शेजाऱ्यांनी कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. तेव्हापासून ते विजयाच्या शोधात आहेत. पाकिस्तानच्या संघातील प्रमुख खेळाडू बाबर आझम आणि शाहीन आफ्रिदी यांच्यावर कोणतीच मोठी जबाबदारी सोपवण्यात आली नाही. तर सौद शकीलला लॉटरी लागल्याचे दिसते. कारण त्याला उपकर्णधार बनवण्यात आले आहे.
पहिल्या कसोटीसाठी पाकिस्तानचा संघ -शान मसूद (कर्णधार), अब्दुला शफीक, सैय अयुब, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान, सलमान अली अघा, शाहीन शाह आफ्रिदी, नसीम शाह, खुर्रम शहजाद, मोहम्मद अली.
चाहत्यांनी घेतली फिरकी