Join us  

PAK vs BAN Live : पाकिस्तानचा त्यांच्याच घरात 'कार्यक्रम', मुशफिकुरने किल्ला लढवला, थोडक्यात द्विशतक हुकले

PAK vs BAN Test Live Score : पाकिस्तानच्या घरात जाऊन बांगलादेशने त्यांना कडवी झुंज दिली. 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 5:11 PM

Open in App

PAK vs BAN 1st Test | रावळपिंडी : पाकिस्तान दौऱ्यावर असलेल्या बांगलादेशने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्याच सामन्यात चमक दाखवली. यजमानांना कडवी झुंज देताना त्यांनी पाकिस्तानची पळता भुई थोडी केली. पाकिस्तान आपल्या मायदेशात बांगलादेशविरूद्ध कसोटी मालिका खेळत आहे. बुधवारी या मालिकेतील सलामीच्या सामन्याला सुरुवात झाली. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना यजमानांनी मोठी धावसंख्या उभारली. पाकिस्तानने आपल्या पहिल्या डावात ११३ षटकांत ६ बाद ४४८ धावा करून डाव घोषित केला. मोहम्मद रिझवान आणि सौद शकील यांच्या मोठ्या खेळीच्या जोरावर शेजाऱ्यांनी पहिल्याच डावात मजबूत पकड बनवली. पण, प्रत्युत्तरात बांगलादेशने देखील सांघिक खेळी करत त्यांच्यापेक्षा मोठी धावसंख्या उभारली. 

बांगलादेशकडून मुशफिकुर रहीमने सर्वाधिक खेळी केली, त्याने १ षटकार आणि २२ चौकारांच्या मदतीने ३४१ चेंडूत १९१ धावांची शानदार खेळी केली. पण, तो केवळ नऊ धावांनी द्विशतकाला मुकला. मोहम्मद अलीच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. तेव्हा बांगलादेशची धावसंख्या १५६.५ षटकांत ७ बाद ५२८ अशी होती. बांगलादेशकडून सलामीवीर शदमन इस्लाम (९३), मोमिनुल हक (५०), लिटन दास (५६), आणि मेहदी हसन (७७) यांनीही अप्रतिम खेळी केली. पाकिस्तानकडून मोहम्मद अली, खुर्रम शहजाद, शाहीन आफ्रिदी आणि नसीम शाह यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले. 

पाकिस्तानचा संघ -शान मसूद (कर्णधार), अब्दुला शफीक, सैय अयुब, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान, सलमान अली अघा, शाहीन शाह आफ्रिदी, नसीम शाह, खुर्रम शहजाद, मोहम्मद अली. 

बांगलादेशचा संघ - नजमूल हुसैन शांतो (कर्णधार), शादमान इस्लाम, झाकिर हसन, मोमिनूल हक,  मुशफिकुर रहमान, शाकिब अल हसन, लिटन दास, महेदी हसन मिराज, शोरफुल इस्लाम, हसन महमूद, नाहिद राणा. 

टॅग्स :पाकिस्तानबांगलादेश