Join us  

PAK vs BAN : Champions Trophy ची तयारी! पाकिस्तानात प्रेक्षकांशिवाय सामना होणार, कारण काय?

दोन कसोटी सामन्यांसाठी बांगलादेशचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर गेला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 1:31 PM

Open in App

PAK vs BAN 2nd Test Match : पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होत आहे. पाकिस्तान दौऱ्यावर असलेल्या बांगलादेशसमोर यजमानांना कडवी झुंज देण्याचे मोठे आव्हान असेल. २१ ऑगस्टपासून पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाईल. शान मसूदच्या नेतृत्वातील पाकिस्तानी संघ आपल्या पहिल्या विजयाच्या शोधात आहे. याआधी मसूदच्या नेतृत्वात शेजाऱ्यांनी कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. तेव्हापासून ते विजयाच्या शोधात आहेत. पाकिस्तानच्या संघातील प्रमुख खेळाडू बाबर आझम आणि शाहीन आफ्रिदी यांच्यावर कोणतीच मोठी जबाबदारी सोपवण्यात आली नाही. तर सौद शकीलला लॉटरी लागल्याचे दिसते. कारण त्याला उपकर्णधार बनवण्यात आले आहे. 

दरम्यान, कराची येथे होणारा दुसरा कसोटी सामना प्रेक्षकांशिवाय पार पडेल. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ची स्पर्धा पाकिस्तानात पार पडणार आहे. यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने स्टेडियमच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. कराची येथील नॅशनल बँक क्रिकेट स्टेडियममध्ये चाहत्यांना प्रवेश नसेल. ३० ऑगस्ट ते ३ सप्टेंबर यादरम्यान दुसरा कसोटी सामना खेळवला जाईल. एक निवेदन काढून पीसीबीने प्रेक्षकांना प्रवेश दिला जाऊ शकत नाही याबाबत खेद व्यक्त केला. पण, हे पाऊल केवळ प्रेक्षकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने घेण्यात आले असून, आगामी काळात आयसीसीची स्पर्धा होत असल्याने नवीन प्रेक्षक गॅलरीचेही काम सुरू असल्याचे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले.  

पाकिस्तानचा संघ -शान मसूद (कर्णधार), सौद शकील (उपकर्णधार), आमिर जमाल, अब्दुला शफीक, अबरार अहमद, बाबर आझम, कामरान घुलाम, खुर्रम शहजाद, मीर हमजा, मोहम्मद अली, मोहम्मद हुरैया, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, सैय अयुब, सलमान अली अघा, सर्फराज अहमद, शाहीन शाह आफ्रिदी.

PAK vs BAN कसोटी मालिकापहिला सामना, रावळपिंडी (२१ ते २५ ऑगस्ट)दुसरा सामना, कराची (३० ऑगस्ट ते ३ सप्टेंबर)

टॅग्स :पाकिस्तानबांगलादेशआयसीसी