PAK vs BAN Test Series : पाकिस्तानात जाऊन पाकिस्तानचा दारुण पराभव करणाऱ्या बांगलादेशसमोर पुढील आव्हान हे भारताचे आहे. १९ सप्टेंबरपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी पाकिस्तान दौऱ्यावर गेलेल्या बांगलादेशने ऐतिहासिक कामगिरी करताना २-० ने मालिका खिशात घातली. दुसरा सामना जिंकण्यासाठी बांगलादेशला मोठा संघर्ष करावा लागला असली तरी त्यांच्या या कामगिरीने इतिहास रचला. या विजयामुळे बांगलादेशच्या संघाचा आत्मविश्वास शिगेला पोहोचला असेल यात शंका नाही. विजयानंतर कर्णधार नजमुल हुसेन शांतोने बोलकी प्रतिक्रिया देताना टीम इंडियाला इशारा दिला.
विजयानंतर बांगलादेशचा कर्णधार म्हणाला की, मी माझ्या भावना शब्दांत मांडू शकत नाही. बांगलादेश क्रिकेटसाठी हा एक मोठा क्षण आहे. भारताविरुद्धची पुढील मालिका आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. या विजयामुळे आम्हाला खूप आत्मविश्वास मिळेल. या कठीण परिस्थितीत मेहदी हसेनने ज्या प्रकारे गोलंदाजी केली आणि पाच बळी घेतले ते खूपच प्रभावी आहे. त्यामुळे आशा आहे की, भारताविरुद्धही आम्ही अशीच कामगिरी करू.
दरम्यान, सलामीच्या सामन्यात झालेल्या दारुण पराभवानंतर पाकिस्तानला आणखी एक मोठा झटका बसला. पाहुण्या बांगलादेशनेपाकिस्तानला दणका देत दुसरा सामना देखील जिंकला. यासह शेजाऱ्यांना आपल्या घरात सलग दहाव्या सामन्यात विजयापासून दूर राहावे लागले. खरे तर पाकिस्तानला मायदेशात झालेल्या मागील दहा सामन्यांमध्ये एकही विजय मिळवता आला नाही. शान मसूदच्या नेतृत्वातील पाकिस्तानी संघ अद्याप आपल्या पहिल्या विजयाच्या शोधात आहे. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी पाकिस्तान दौऱ्यावर गेलेल्या बांगलादेशने ऐतिहासिक कामगिरी करताना २-० ने मालिका खिशात घातली.
बांगलादेशचा भारत दौरा
१९-२४ सप्टेंबर - पहिला कसोटी सामना, चेन्नई
२७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर - दुसरा कसोटी सामना, कानपूर
६ ऑक्टोबर - पहिला ट्वेंटी-२० सामना, ग्वाल्हेर
९ ऑक्टोबर - दुसरा ट्वेंटी-२० सामना, दिल्ली
१२ ऑक्टोबर - तिसरा ट्वेंटी-२० सामना, हैदराबाद
Web Title: pak vs ban Bangladesh captain Najmul Hossain Shanto said, hope he can do the same against India
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.