ICC ODI World Cup PAK vs BAN Live : वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या पाकिस्तान संघाने आज ईडन गार्डनवर बांगलादेशविरुद्ध पहिल्या इनिंग्जमध्ये वर्चस्व गाजवलेले पाहायला मिळतेय. पाकिस्तानचा प्रमुख गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीसह आज सर्वांनाच लय सापडल्याचे दिसले. लिटन दास आणि महमुदुल्लाह यांनी मधल्या षटकांचा संघर्ष केला, परंतु तो बांगलादेशसाठी पुरेसा नाही ठरला.
बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. शाहीन आफ्रिदीने पहिल्याच षटकात बांगलादेसचा तनझिद हसनला पायचीत केले आणि ही त्याची वन डे क्रिकेटमधील १०० वी विकेट ठरली.पाकिस्तानकडून सर्वात कमी ५१ सामन्यांत १०० विकेट्स घेण्याचा पराक्रम शाहीनने नावावर केला आणि त्याने साकलेन मुश्ताक ( ५३) याचा विक्रम मोडला. पुढच्याच षटकात शाहीनने नजमूल शांतोला ( ४) बाद केले. हॅरिस रौफने तिसरा धक्का देताना मुश्फीकर रहीमला ( ५) बाद केले.
महमुदुल्लाह व लिटन दास यांनी चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी पूर्ण करून बांगलादेशचा डाव सावरला. २१ व्या षटकात इफ्तिखार अहमदने ही जोडी तोडली. लिटन ६४ चेंडूंत ४५ धावांवर झेलबाद झाला आणि महमुदुल्लाहसह त्याने ८९ चेंडूंत ७९ धावा जोडल्या होत्या. महमुदुल्लाहने पुन्हा एकदा उपयुक्त अर्धशतक ( ५६) झळकावून बांगलादेशसाठी खिंड लढवली. शाहीन आफ्रिदीने त्याचा त्रिफळा उडवून ही महत्त्वाची विकेट मिळवून दिली. तोवहिद हृदोय ( ७) आज अपयशी ठरला.
शाकिब अल हसन व मेहिदी हसन मिराझ यांनी सातव्या विकेटसाठी ४५ धावांचे उपयुक्त योगदान दिले. शाकिबला ( ४३) रौफने बाद केले. मिराझही २५ धावांवर बाद झाला, मोहम्मद वसीम ज्यु. ने ही विकेट घेतली. वसीमने त्यानंतर दोन धक्के देताना बांगलादेशचा संपूर्ण संघ ४५.१ षटकांत २०४ धावांवर गुंडाळला. शाहीन आणि वसमीने प्रत्येकी ३, तर रौफने २ विकेट घेतल्या.
Web Title: PAK vs BAN Live : PAK vs BAN Live : Bangladesh bowled out for 204 runs against Pakistan.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.