PAK vs BAN Test Series : २१ ऑगस्टपासून पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाईल. शान मसूदच्या नेतृत्वातील पाकिस्तानी संघ आपल्या पहिल्या विजयाच्या शोधात आहे. याआधी मसूदच्या नेतृत्वात शेजाऱ्यांनी कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. तेव्हापासून ते विजयाच्या शोधात आहेत. पाकिस्तानच्या संघातील प्रमुख खेळाडू बाबर आझम आणि शाहीन आफ्रिदी यांच्यावर कोणतीच मोठी जबाबदारी सोपवण्यात आली नाही. तर सौद शकीलला लॉटरी लागल्याचे दिसते. कारण त्याला उपकर्णधार बनवण्यात आले आहे. खरे तर पाकिस्तानच्या सततच्या पराभवामुळे चाहत्यांनी सामन्यांकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. त्यात कसोटी मालिका होत असल्याने तिकीटांची तुरळक प्रमाणात विक्री होत आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने तिकिटांचे दर इतके स्वस्त ठेवले आहेत की कोणताही पाकिस्तानी चाहता स्टेडियममध्ये येऊन हा सामना सहज पाहू शकतो. तिकीटाची सुरुवातीची किंमत पाकिस्तानी रूपयानुसार ५० रूपये आहे, तर भारतीय रूपयानुसार १५ रूपये एवढी आहे. सर्वात कमी किमतीच्या तिकिटाची किंमत पाकिस्तानी रूपयानुसार ५० रूपये आहे. रावळपिंडी स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी प्रीमियम स्टँड तिकिटांची किंमत २०० रूपये आहे.
दरम्यान, कराचीमध्ये प्रथम श्रेणीच्या तिकिटाची किंमत १०० रूपये आहे, तर प्रीमियम तिकिटाची किंमत २०० एवढी आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे, तर कराचीतील नॅशनल स्टेडियममध्ये मालिकेतील दुसरा आणि अंतिम सामना होईल. १२ ऑगस्ट रोजी बांगलादेशचा क्रिकेट संघ पाकिस्तानात पोहोचला.
पाकिस्तानचा संघ -शान मसूद (कर्णधार), सौद शकील (उपकर्णधार), आमिर जमाल, अब्दुला शफीक, अबरार अहमद, बाबर आझम, कामरान घुलाम, खुर्रम शहजाद, मीर हमजा, मोहम्मद अली, मोहम्मद हुरैया, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, सैय अयुब, सलमान अली अघा, सर्फराज अहमद, शाहीन शाह आफ्रिदी.
PAK vs BAN कसोटी मालिकापहिला सामना, रावळपिंडी (२१ ते २५ ऑगस्ट)दुसरा सामना, कराची (३० ऑगस्ट ते ३ सप्टेंबर)