pak vs ban test series : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्यांच्या मायदेशात होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी आपल्या संघाची घोषणा केली आहे. २१ ऑगस्टपासून पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाईल. शान मसूदच्या नेतृत्वातील पाकिस्तानी संघ आपल्या पहिल्या विजयाच्या शोधात आहे. याआधी मसूदच्या नेतृत्वात शेजाऱ्यांनी कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. तेव्हापासून ते विजयाच्या शोधात आहेत. पाकिस्तानच्या संघातील प्रमुख खेळाडू बाबर आझम आणि शाहीन आफ्रिदी यांच्यावर कोणतीच मोठी जबाबदारी सोपवण्यात आली नाही. तर सौद शकीलला लॉटरी लागल्याचे दिसते. कारण त्याला उपकर्णधार बनवण्यात आले आहे.
पाकिस्तानने जाहीर केलेल्या १७ सदस्यीय संघात काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. सौद शकीलचे प्रमोशन झाले असून, त्याची उपकर्णधारपदी वर्णी लागली आहे. शाहीन आफ्रिदीची जागा शकीलने घेतल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. पीसीबीने आफ्रिदीवरचा कामाचा ताण कमी व्हावा या हेतूने हा निर्णय घेतला. पाकिस्तानी संघ एप्रिलपर्यंत ९ कसोटी, १४ ट्वेंटी-२० आणि जवळपास १७ वन डे सामने खेळणार आहे. शान मसूदच्या नेतृत्वातील संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी सौद शकीलवर सोपवल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. सलामीवीर इमाम-उल-हकला संघाबाहेर व्हावे लागले तर हसन अली आणि मोहम्मद वसीम ज्युनिअर यांना दुखापतीमुळे विचारात घेतले गेले नाही. याशिवाय फहीम अश्रफ, मोहम्मद नवाज, नोमान अली आणि साजिद खान यांनाही वगळण्यात आले.
पाकिस्तानचा संघ -शान मसूद (कर्णधार), सौद शकील (उपकर्णधार), आमिर जमाल, अब्दुला शफीक, अबरार अहमद, बाबर आझम, कामरान घुलाम, खुर्रम शहजाद, मीर हमजा, मोहम्मद अली, मोहम्मद हुरैया, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, सैय अयुब, सलमान अली अघा, सर्फराज अहमद, शाहीन शाह आफ्रिदी.
PAK vs BAN कसोटी मालिकापहिला सामना, रावळपिंडी (२१ ते २५ ऑगस्ट)दुसरा सामना, कराची (३० ऑगस्ट ते ३ सप्टेंबर)