Join us  

PAK vs ENG 1st Test : हे आम्ही पूर्वीच केलंय! इंग्लंडकडून पाकिस्तानची बेक्कार धुलाई; सेहवाग-द्रविड यांच्या ४१० धावांच्या भागीदारीची स्कोअरशीट Viral 

PAK vs ENG 1st Test : पाकिस्तानच्या गोलंदाजांची घरच्या मैदानावर बेक्कार धुलाई सुरू आहे. पहिल्या कसोटीपूर्वी इंग्लंडचे १२ हून अधिक खेळाडू पडले होते आणि सक्षम ११ खेळाडू मैदानावर उतरवले.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2022 1:58 PM

Open in App

PAK vs ENG 1st Test : पाकिस्तानच्या गोलंदाजांची घरच्या मैदानावर बेक्कार धुलाई सुरू आहे. पहिल्या कसोटीपूर्वी इंग्लंडचे १२ हून अधिक खेळाडू पडले होते आणि सक्षम ११ खेळाडू मैदानावर उतरवले. प्रथम फलंदाजीला येताना इंग्लंडच्या सलामीवीरांनीच पाकिस्तानच्या गोलंदाजांना बेक्कार चोपले. बेन डकेट व झॅक क्रॅवली यांनी डावाची सुरुवातच आक्रमक करून देताना २००+ धावा फलकावर चढवल्या. इंग्लंडच्या सलामीवीरांची ही फटकेबाजी सुरू असताना टीम इंडियाच्या वीरेंद्र सेहगाग व राहुल द्रविड यांच्या ४१० धावांच्या विक्रमी भागीदारीची स्कोअरशीट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. 

क्रॅवली व डकेट यांन सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करताना ८ षटकांत फलकावर अर्धशतकी धावा चढवल्या. त्यांची ही आक्रमकता पाहून पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम सतत गोलंदाजीत बदल करताना दिसला, परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. ९९ धावांवर असताना क्रॅवलीला LBW दिले गेले, परंतु त्याने DRS घेतला अन् पाकिस्ताच्या चेहऱ्यावरील आनंद हिरावला. क्रॅवलीने चौकार खेचून ८६ चेंडूंत शतक पूर्ण केले. डकेटनेही ९० चेंडूंत ८० धावा करताना इंग्लंडची धावसंख्या ३० षटकांत बिनबाद १९१ धावांवर पोहोचवली. पाठोपाठ बेन डकेटनेही शतक पूर्ण केले. जाहीद महमूदने २३३ धावांवर इंग्लंडला पहिला धक्का दिला. डकेट ११० चेंडूंत १५ चौकारांच्या मदतीने १०७ धावांवर माघारी परतला.  भारतीय संघाने २००६च्या पाकिस्तान दौऱ्यावर लाहोर कसोटीत पाकिस्तानला बेक्कार चोपले होते. पाकिस्ताने पहिला डाव ७ बाद ६७९ धावांवर घोषित केल्यानंतर वीरेंद्र सेहवाग व राहुल द्रविड ही जोडी सलामीला आली. कर्णधार द्रविड व वीरूने पहिल्या विकेटसाठी ४१० धावांची विक्रमी भागीदारी केली. वीरू २४७ चेंडूंत ४७ चौकार व १ षटकारासह २५४ धावांवर माघारी परतला, द्रविड १२८ धावांवर नाबाद राहिला आणि हा सामना ड्रॉ झाला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :भारत विरुद्ध पाकिस्तानपाकिस्तानइंग्लंडविरेंद्र सेहवागराहुल द्रविड
Open in App