PAK vs ENG 1st Test : पाकिस्तानी गोलंदाजांची कसोटीत इंग्लंडकडून ट्वेंटी-२० स्टाईल धुलाई; आजारी असूनही खेळतायेत मॅच
PAK vs ENG 1st Test : पाकिस्तानी गोलंदाजांची कसोटीत इंग्लंडकडून ट्वेंटी-२० स्टाईल धुलाई; आजारी असूनही खेळतायेत मॅच
PAK vs ENG 1st Test : पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटीपूर्वी इंग्लंडचे १२ हून अधिक खेळाडू पडले होते आणि त्यामुळे आजपासून सुरू होणाऱ्या सामन्यावर अनिश्चिततेचे सावट होते.
By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2022 1:25 PM
PAK vs ENG 1st Test : पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटीपूर्वी इंग्लंडचे १२ हून अधिक खेळाडू पडले होते आणि त्यामुळे आजपासून सुरू होणाऱ्या सामन्यावर अनिश्चिततेचे सावट होते. पण, इंग्लंडच्या खेळाडूंनी आम्ही सक्षम ११ खेळाडू मैदानावर उतरवण्यास तयार आहोत सांगितले आणि पाकिस्तानला आव्हान दिले. प्रथम फलंदाजीला येताना इंग्लंडच्या सलामीवीरांनीच पाकिस्तानच्या गोलंदाजांना चोपून काढले. बेन डकेट व झॅक क्रॅवली यांनी डावाची सुरुवातच आक्रम केली.
पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील तीन कसोटी सामने ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या पर्वाचा भाग आहेत. पहिला सामना रावळपिंडी येथे १ ते ५ डिसेंबर, दुसरा सामना मुल्तान येथे ९ ते १३ डिसेंबर आणि शेवटचा सामना कराची येथे १७ ते २१ डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे. इंग्लंडचे WTC मधील आव्हान संपुष्टात आले आहे. क्रॅवली व डकेट यांन सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करताना ८ षटकांत फलकावर अर्धशतकी धावा चढवल्या. त्यांची ही आक्रमकता पाहून पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम सतत गोलंदाजीत बदल करताना दिसला, परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. ९९ धावांवर असताना क्रॅवलीला LBW दिले गेले, परंतु त्याने DRS घेतला अन् पाकिस्ताच्या चेहऱ्यावरील आनंद हिरावला. क्रॅवलीने चौकार खेचून ८६ चेंडूंत शतक पूर्ण केले. डकेटनेही ९० चेंडूंत ८० धावा करताना इंग्लंडची धावसंख्या ३० षटकांत बिनबाद १९१ धावांवर पोहोचवली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"