Pakistan vs England 2nd Test : इंग्लंडने पहिल्या कसोटीत रोमहर्षक विजयाची नोंद केल्यानंतर पाकिस्तानने आजपासून सुरू झालेल्या दुसऱ्या सामन्यात जबरदस्त पलटवार केला. मुल्तान कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या इंग्लंडचा संघ २८१ धावांत तंबूत परतला. पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या २४ वर्षीय अब्रार अहमद ( Abrar Ahmed) याने सात विकेट्स घेत इतिहास घडवला. त्याला ३४ वर्षीय फिरकीपटू झहीद महमूदची साथ मिळाली.
पहिल्या कसोटीतील शतकवीर झॅक क्रॅवली आज १९ धावांवर माघारी परतला. अब्रारने त्याचा त्रिफळा उडवला. बेन डकेट व ऑली पोप यांनी अर्धशतकी खेळी करताना इंग्लंडचा डाव सावरला होता, परंतु अब्रारच्या फिरकीसमोर त्यांची त्रेधातिरिपीट झाली. बेन डकेट ६३ व पोप ६० धावांवर बाद झाला. जो रूट ( ८) व हॅरी ब्रूक ( ९) यांनाही त्याने स्वस्तात बाद केले. कर्णधार बेन स्टोक्स ( ३०) व विक जॅक्स ( ३१) यांनी संघर्ष दाखवला. पण, अब्रारसमोर ते फार काळ टिकू शकले नाही.
Best bowling figures in an innings for Pakistan in debut Test :-7/99 - Mohammad Nazir vs NZ, 19697/114 - Abrar Ahmed vs ENG, today
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"