PAK vs ENG : जो रुटने ढाबे दणाणून टाकले, बाबर आजमला पाकिस्तानींनी 'झिम्बाब्वर' म्हणून हिणवले; Video viral 

PAK vs ENG 2nd Test : इंग्लंडचा फलंदाज जो रूट याने पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत  वेगळ्या विक्रमाची नोंद केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 12:29 PM2022-12-12T12:29:09+5:302022-12-12T12:29:57+5:30

whatsapp join usJoin us
PAK vs ENG 2nd Test : Joe Root becomes just the 3rd player in Test cricket history to score 10,000 runs and pick 50 wickets, Pakistani crowd shouting "Zimbabar" & "Ghante ka king" at Babar Azam, Video | PAK vs ENG : जो रुटने ढाबे दणाणून टाकले, बाबर आजमला पाकिस्तानींनी 'झिम्बाब्वर' म्हणून हिणवले; Video viral 

PAK vs ENG : जो रुटने ढाबे दणाणून टाकले, बाबर आजमला पाकिस्तानींनी 'झिम्बाब्वर' म्हणून हिणवले; Video viral 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

PAK vs ENG 2nd Test : इंग्लंडचा फलंदाज जो रूट याने पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत  वेगळ्या विक्रमाची नोंद केली. दुसऱ्या डावात जो रूटनेपाकिस्तानी फलंदाज फहीम अश्रफला बाद केले. यासह त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ५० बळी पूर्ण केले. इतकेच नाही तर जो रूट आता जगातील तिसरा क्रिकेटर आहे, ज्याच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये ५० विकेट्स व १०००० हून अधिक धावा आहेत. रूटच्या आधी फक्त जॅक कॅलिस आणि स्टीव्ह वॉ यांनी कसोटी क्रिकेटमध्ये असा पराक्रम केला होता.

जॅक कॅलिसने आपल्या कसोटी कारकिर्दीत १३२८९ धावा केल्या आहेत, तर २९२ बळी घेतले आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉने आपल्या कसोटी कारकिर्दीत १०९२७ धावा केल्या आहेत, तर ९२ बळी घेण्यात तो यशस्वी ठरला आहे. दुसरीकडे, रूटबद्दल बोललो तर इंग्लंडच्या या माजी कर्णधाराने आतापर्यंत १०६२९ धावा केल्या आहेत आणि ५० विकेट्स घेण्यासही यश मिळवले आहे. सध्याच्या खेळाडूंमध्ये असे करणारा रूट हा एकमेव क्रिकेटपटू आहे. इंग्लंडने विजयासाठी ठेवलेल्या ३५५ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानने ६ बाद २९१ धावा केल्या आहेत आणि त्यांना ६४ धावा हव्या आहेत.

इंग्लंडने पहिला कसोटी सामना जिंकून इतिहासाची पुनरावृत्ती केली. तब्बल २२ वर्षांनंतर इंग्लंडला पाकिस्तानमध्ये कसोटी जिंकण्यात यश मिळाले. त्याचबरोबर इंग्लंडचा संघ १७ वर्षांनंतर पाकिस्तानमध्ये कसोटी खेळत आहे.

दरम्यान, कर्णधार बाबर आजम १ धावा करून ओली रॉबिन्सनच्या गोलंदाजीवर बाद झाला. बाबरने पहिल्या डावात ७५ धावा केल्या होत्या आणि दुसऱ्या डावात बाबरकडून मोठ्या अपेक्षा असताना, पण ओली रॉबिन्सनच्या शानदार चेंडूवर तो बोल्ड झाला. यानंतर बाबर पॅव्हेलियनमध्ये जात असताना पाकिस्तानी चाहत्यांनी त्यांची खिल्ली उडवली आणि 'झिम्बाब्वर'च्या घोषणा देत आपला राग काढला, हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 


सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: PAK vs ENG 2nd Test : Joe Root becomes just the 3rd player in Test cricket history to score 10,000 runs and pick 50 wickets, Pakistani crowd shouting "Zimbabar" & "Ghante ka king" at Babar Azam, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.