Join us  

Kamran Ghulam चा शतकी नजराणा! पदार्पणात असा पराक्रम करणारा पाकचा दुसरा वयस्क बॅटर

या कामगिरीसह त्याने खास क्लबमध्येही एन्ट्री मारली आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 6:14 PM

Open in App

Kamran Ghulam Becomes Pakistan's 2nd Oldest Man To Hit Test Hundred On Debut : इंग्लंड विरुद्धच्या मुल्तान कसोटी सामन्यातून कामरान गुलाम (Kamran Ghulam) यानं अगदी दाबात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. स्टार बॅटर बाबर आझमच्या जागी मिळालेल्या संधीच सोन करताना त्याने शतकी खेळी साकारली. त्यामुळे पदार्पणाचा सामना त्याच्यासाठी अविस्मरणीय ठरला आहे. पाकिस्तानकडून पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावणारा तो १३ वा खेळाडू आहे. या कामगिरीसह त्याने खास क्लबमध्येही एन्ट्री मारली आहे. 

पदार्पणात सेंच्युरी ठोकणारा दुसरा वयस्क खेळाडू ठरला गुलाम; पहिला कोण?

कामरान गुलाम याला वयाच्या २९ व्या वर्षी पदार्पणाची संधी मिळाली. शतकी खेळीसह त्याने आपली निवड सार्थ ठरवताना एक खास विक्रमही आपल्या नावे केला. पदार्पणात शतकी खेळी करणारा पाकिस्तानचा तो दुसरा वयस्क  खेळाडू आहे. याआधी आबिद अली याने तिशी पार झाल्यावर पदार्पण करताना पदार्पणात शतक झळकावण्याचा पराक्रम केला होता. पाकिस्तानचा माजी सलामीवीर आबिद अली याने २०१९ मध्ये कसोटी या क्रिकेटच्या दोन्ही प्रकारातील पदार्पणाच्या सामन्यात शतकी खेळी केली होती.

पाकिस्तानकडून कसोटी पदार्पणात शतकी खेळी करणारे फलंदाज

  • खालिद इब्दुल्ला १६६ विरुद्ध ऑस्ट्रेलिया, कराची (१९६४)
  • जावेद मियादाँद १६३ विरुद्ध न्यूझीलंड, लाहोर (१९७६)
  • सलीम मलिक १००* विरुद्ध श्रीलंका, कराची (१९८२)
  • मोहम्मद वासिम १०९* न्यूझीलंड, लाहोर (१९९६) 
  • अझर महमूद १२८* विरुद्ध दक्षिण आफ्रिका, रावळपिंडी (१९९७)
  • अली नक्वी ११५  विरुद्ध दक्षिण आफ्रिका, रावळपिंडी (१९९७)
  • युनिस खान १०७ विरुद्ध श्रीलंका, रावळपिंडी (२०००)
  • तौफिक उम १०४ विरुद्ध बांगलादेश, मुल्तान (२००१)
  • यासीर हमीद १७०&१०५ विरुद्ध बांगलादेश, कराची
  • फवाद अलम १६८ विरुद्ध श्रीलंका, कोलंबो (२००९)
  • उमर अकमल १२९ विरुद्ध न्यूझीलंड दुनेंडीन २००९ 
  • आबिद अली १०९* विरुद्ध श्रीलंका, रावळपिंडी २०१९
  • कामरान गुलाम १००* विरुद्ध इंग्लंड, मुल्तान, २०२४  

आधी डाव सावरला, मग शतकी खेळीसह पाक संघाला केलं आणखी मजबूत 

पाकिस्तान संघाने पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय घेतल्यावर पहिल्या दोन विकेट्स लवकर पडल्या. त्यानंतर पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या कामरान गुलाम याने सैम अयुबसोबत संघाच्या डावाला आकार दिला. अयुब अर्धशतकी खेळी करून माघारी फिरल्यानंतर दुसऱ्या बाजूनं त्याने आपला खेळ कायम ठेवला. १९२ चेंडूत त्याने शतक पूर्ण केले. 

टॅग्स :पाकिस्तानइंग्लंड