Join us  

PAK vs ENG, 3rd Test : मित्र-परिवारासोबत पार्टीला जाऊ दिले म्हणून भडकला बाबर आजम; एक तास फिल्डिंगलाच आला नाही 

PAK vs ENG 3rd Test : पाकिस्तानचा दुसरा डाव २१६ धावांत गडगडला असून इंग्लंडसमोर १६७ धावांचे माफक लक्ष्य आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 5:56 PM

Open in App

PAK vs ENG, 3rd Test : पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम १८ डिसेंबरला इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी एक तास मैदानावर फिल्डिंगलाच उतरला नाही. खेळाडू आणि त्यांच्या कुटुंबीयांना कडक सुरक्षा नियमांतून सूट न दिल्याबद्दल त्याने निषेध नोंदवण्यासाठी असे केल्याची चर्चा रंगली आहे.  

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, बाबर आजमला शनिवारी रात्री इतर सहकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसह टीम हॉटेलमध्ये जेवायला बाहेर जाण्यापासून रोखले गेले, तेव्हा तो संतापला. बाबर आजमसह सर्फराज अहमद, अझहर अली, शान मसूद आणि इमाम उल हक आणि त्यांच्या कुटुंबीयांनी स्थानिक रेस्टॉरंटमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. जाण्याची सर्व तयारी झाली होती. 

मात्र, बाबर आजम हॉटेलच्या खोलीतून खाली आल्यावर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना बाहेर जाण्यापासून रोखले. त्याने स्पष्ट केले की त्याला आणि इतर खेळाडूंना बाहेर जाण्यासाठी पूर्वपरवानगी घ्यावी लागेल. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी दोन्ही संघांना राष्ट्रपती स्तरावरील सुरक्षा पुरवण्यात आली आहे.  बाबर सुरक्षा उपायांवर नाराज होता आणि एका वरिष्ठ अधिकाऱ्याशी जोरदार वाद झाल्यानंतर रागाने आपल्या खोलीत परतला. 

रविवारी, तो एक तास संघाचे नेतृत्व करण्यासाठी आला नाही आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या वागणुकीचा निषेध करण्यासाठी ड्रेसिंग रूममध्येच राहिला. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) या मुद्द्यावर मौन पाळले आहे, परंतु बाबर डोकेदुखीमुळे पहिला तास मैदानात उतरला नाही, असे अधिकृतपणे सांगण्यात आले आहे.

दरम्यान पाकिस्तानचा दुसरा डाव २१६ धावांत गडगडला असून इंग्लंडसमोर १६७ धावांचे माफक लक्ष्य आहे. इंग्लंडच्या रेहान अहमदने ४८ धावांत ५ विकेट्स घेतल्या. जॅक लिचने तीन विकेट्स घेतल्या. पदार्पणात डावात पाच विकेट्स घेणारा तो युवा गोलंदाज ठरला. इंग्लंडने लक्ष्याचा पाठलाग करताना १५ षटकांत २ बाद १०४ धावा चोपल्या आहेत. 

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :पाकिस्तानइंग्लंडबाबर आजम
Open in App