PAK vs ENG : पाकिस्तान जग जिंकायला निघाले अन् घरच्या मैदानावर इंग्लंडकडून 'बेक्कार' हरले!

Pakistan vs England  7th T20I Live : ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पाकिस्तानला त्यांच्याच घरच्या मैदानावर हार पत्करावी लागली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2022 08:45 AM2022-10-03T08:45:46+5:302022-10-03T08:46:25+5:30

whatsapp join usJoin us
PAK vs ENG 7th T20I Live : England win a T20I series after 25 years in Pakistan, beat Babar Azam & co. by 67 runs | PAK vs ENG : पाकिस्तान जग जिंकायला निघाले अन् घरच्या मैदानावर इंग्लंडकडून 'बेक्कार' हरले!

England win a T20I series after 25 years in Pakistan

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Pakistan vs England  7th T20I Live : ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पाकिस्तानला त्यांच्याच घरच्या मैदानावर हार पत्करावी लागली. इंग्लंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत पाकिस्तानने कमबॅक केले खरे, परंतु इंग्लंडने अखेरच्या दोन ट्वेंटी-२० आपले पत्ते उघडले. दुसऱ्या फळीतील खेळाडूंना पाकिस्तानात दाखल झालेल्या इंग्लंडसमोर हार मानावी लागल्याने बाबर आजम अँड कंपनीवर टीका होतेय. इंग्लंडने ही मालिका ४-३ अशी जिंकली.


प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडची सुरुवात काही चांगली झाली  नाही. फिल सॉल्ट ( २०) व अॅलेक्स हेल्स  ( १९) हे सलामीवीर स्वस्तात माघारी परतले. कर्णधार बाबरने दोन सोपे झेल टाकल्याने पाकिस्तानसमोर अडचण निर्माण झाली. डेवीड मलान व बेन डकेट यांनी इंग्लंडला सामन्यात कमबॅक करून दिले. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी केली. डकेट १९ चेंडूंत ३ चौकार व १ षटकार मारून ३० धावांवर रन आऊट झाला. त्यानंतर आलेल्या हॅरी ब्रुकने चौथ्या विकेटसाठी मलानसह १०८ धावा चोपल्या. मलानने ४७ चेंडूंत ८ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ७८ धावा केल्या, तर ब्रुकने २९ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह नाबाद ४६ धावा कुटल्या. इंग्लंडने ३ बाद २०९ धावांचा डोंगर उभा केला.

मोहम्मद रिझवान ( १), कर्णधार बाबर ( ४) व इफ्तिकार अहमद ( १९) माघारी परतल्याने पाकिस्तानची अवस्था ३ बाद ३३ झाली होती. शान मसूद व खुशदिल शाह यांनी इंग्लंडच्या गोलंदाजांचा सामना केला. आदिल राशिदने ही जोडी तोडतानान शाहला २७ धावांवर माघारी पाठवले. त्यानंतर पाकिस्तानच्या फलंदाजांनी तंबूत परतण्याची लाईनच लावली. शान मसूदने ४३ चेंडूंत ४ चौकार व १षटकार खेचून ५६ धावांची एकाकी झुंज दिली. पाकिस्तानला २० षटकांत ८ बाद १४२ धावा करता आल्या. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: PAK vs ENG 7th T20I Live : England win a T20I series after 25 years in Pakistan, beat Babar Azam & co. by 67 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.