PAK vs ENG : पाकिस्तान-इंग्लंड मॅचसाठी स्टेडियमबाहेर कैद्यांसाठीच्या ५ गाड्या, PCBच्या अजब कारभाराची चर्चा

Pakistan vs England 2nd T20I : पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातली दुसरी ट्वेंटी-२० लढत आज कराचीतील नॅशनल स्टेडियमवर खेळवली जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 06:53 PM2022-09-22T18:53:14+5:302022-09-22T18:55:26+5:30

whatsapp join usJoin us
PAK vs ENG : A coronavirus case reported in the support staff of T20 squad of Pakistan, 5 prisoner vans reported to be deployed at National Stadium Karachi | PAK vs ENG : पाकिस्तान-इंग्लंड मॅचसाठी स्टेडियमबाहेर कैद्यांसाठीच्या ५ गाड्या, PCBच्या अजब कारभाराची चर्चा

PAK vs ENG : पाकिस्तान-इंग्लंड मॅचसाठी स्टेडियमबाहेर कैद्यांसाठीच्या ५ गाड्या, PCBच्या अजब कारभाराची चर्चा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Pakistan vs England 2nd T20I : पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातली दुसरी ट्वेंटी-२० लढत आज कराचीतील नॅशनल स्टेडियमवर खेळवली जात आहे. पहिल्या ट्वेंटी-२०त इंग्लंडने दणदणीत विजय मिळवून ७ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे पाकिस्तानचा संघ आज बरोबरी करण्याच्या निर्धाराने मैदानावर उतरणार आहे. पण, या सामन्यापूर्वी पाकिस्तानच्या सपोर्ट स्टाफमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला. त्यामुळे आजच्या सामन्यात सपोर्ट स्टाफशिवाय पाकिस्तानचा संघ मैदानावर उतरेल. तेच दुसऱ्या एका कारणामुळे हा सामना चर्चेत आला आहे. पाकिस्तान- इंग्लंड सामन्यासाठी स्टेडियमबाहेर ५  कैद्यांसाठीच्या गाड्या (  5 prisoner vans ) उभ्या केल्या आहेत. 

पहिल्या ट्वेंटी-२०त इंग्लंडने यजमान पाकिस्तानवर ६ विकेट्स व ४ चेंडू राखून मात केली. मोहम्मद रिझवानने ६८ धावांची खेळी करताना सर्वात कमी ५२ डावांत ट्वेंटी-२०त २०००+ धावा करण्याच्या बाबर आजमच्या विक्रमाशी बरोबरी केली. पण, त्याची विक्रमी खेळी व्यर्थ गेली. ॲलेक्स केरी व हॅरी ब्रुक यांनी दमदार खेळ केला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने ७ बाद १५८ धावा केल्या. मोहम्मद रिझवान व कर्णधार बाबर आजम यांनी पहिल्या विकेटसाठी ८३ धावांची भागीदारी केली. पण, १०व्या षटकात बाबर  ( ३१) बाद झाला अन् पाकिस्तानचा डाव गडगडला. शेवटच्या ११.३ षटकांत पाकिस्तानने ७ फलंदाज ७५ धावांवर गमावल्याने इंग्लंडसमोर माफक लक्ष्य उभे राहिले. 

प्रत्युत्तरात फिल सॉल्ट ( १०), डेविड मलान ( २०) व बेन डकेट ( २१) हे माघारी परतल्यानंतर सलामीवर ॲलेक्स हेल्स व हॅरी ब्रूक यांनी दमदार खेळ केला. हेल्सने ४० चेंडूंत ७ चौकारांसह ५३  धावा केल्या. ब्रूकने २५ चेंडूंत ७  चौकारांच्या मदतीने नाबाद ४२ धावा केल्या. इंग्लंडने १९.२ षटकांत ४ बाद १६० धावा करून विजय मिळवला. आज दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून बरोबरीचा पाकिस्तानचा प्रयत्न असेल.

 

दरम्यान दंगा करणाऱ्या प्रेक्षकांना धडा शिकवण्यासाठी कराची स्टेडियमबाहेर पाच कैद्यांसाठीच्या गाड्या उभ्या केल्या आहेत. सामन्यात दंगा करणाऱ्या प्रेक्षकांना या गाडीत मॅच संपेपर्यंत बंद केले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 

Web Title: PAK vs ENG : A coronavirus case reported in the support staff of T20 squad of Pakistan, 5 prisoner vans reported to be deployed at National Stadium Karachi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.