Join us  

PAK vs ENG : बाबर आजम म्हणतो की मी एबी डिव्हिलियर्सची कॉपी करतो! इंग्लंडच्या गोलंदाजांना घाबरवण्याचा प्रयत्न 

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम ( Babar Azam) याने केलेल्या एका विधानाची जोरदार चर्चा होतेय.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 4:11 PM

Open in App

Pakistan vs England : पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड यांच्यातल्या पहिल्या कसोटीला उद्यापासून सुरूवात होणार आहे. पण, आज इंग्लंडच्या १२ खेळाडूंची प्रकृती बिघडल्याचे वृत्त समोर येत आहे. अद्याप दोन्ही क्रिकेट बोर्डांकडून याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यात पहिल्या कसोटीपूर्वी दोन्ही संघांच्या कर्णधारांची पत्रकार परिषद झाली. यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम ( Babar Azam) याने केलेल्या एका विधानाची जोरदार चर्चा होतेय. बाबरने २०२२ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये ७३.४४ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. त्याने ९ डावांमध्ये दोन शतकं व ४ अर्धशतकं झळकावली आहेत. आता इंग्लंडच्या गोलंदाजांचा सामना करण्यासाठी त्याने कंबर कसली आहे.

पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील तीन कसोटी सामने ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या पर्वाचा भाग आहेत. पहिला सामना रावळपिंडी येथे १ ते ५ डिसेंबर, दुसरा सामना मुल्तान येथे ९ ते १३ डिसेंबर आणि शेवटचा सामना कराची येथे १७ ते २१ डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे. इंग्लंडचे WTC मधील आव्हान संपुष्टात आले आहे. बाबर म्हणाला, ''खरं सांगायचं तर एबी डिव्हिलियर्स याला मी आदर्श मानतो. मला तो खूप आवडतो आणि तो ज्याप्रकारे खेळतोय व तो सर्व प्रकारचे फटके मारतो, ते मला आवडतात. जेव्हा मी एबी डिव्हिलियर्सला टीव्हीवर पाहतो, त्याच्या दुसऱ्या दिवशी नेट्समध्ये मी त्याची कॉपी करण्याचा प्रयत्न करतो. मी एबी सारखा खेळण्याचा प्रयत्न करतो.''

एबीने २०१८मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि कसोटीत त्याची ५०.६६ची सरासरी आहे आणि त्याने २२ शतकं झळकावली आहेत. दरम्यान, बाबरने इंग्लंडविरुद्ध मालिका जिंकण्याचा निर्धार व्यक्त केलाय. तो म्हणाला, आम्ही ही ऐतिहासिक मालिका जिंकण्याचा प्रयत्न करणार आहोत. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये यापैकी अनेकांविरुद्ध मी खेळलो आहे आणि त्यामुळे त्यांचा खेळ मला माहित्येय.''

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :बाबर आजमएबी डिव्हिलियर्सइंग्लंडपाकिस्तान
Open in App