PAK vs ENG : पराभव टाळण्यासाठी पाकिस्तानी फलंदाज 'टॉयलेट'ला पळाला, बेन स्टोक्सचा चढलेला पारा; Video Viral

PAK vs ENG 1st Test : इंग्लंडने रावळपिंडी कसोटीत पाकिस्तानचा ७४ धावांनी पराभव केला. पण, हा पराभव टाळण्यासाठी पाकिस्तानी फलंदाजांकडून मैदानावरील संघर्ष अपयशी ठरत असल्याने वेगळाच मार्ग निवडला.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 04:44 PM2022-12-06T16:44:14+5:302022-12-06T16:44:38+5:30

whatsapp join usJoin us
PAK vs ENG : Ben Stokes' mercury rises as Pakistani batsman mohammad ali went to the toilet for restroom break to avoid defeat; Video Viral | PAK vs ENG : पराभव टाळण्यासाठी पाकिस्तानी फलंदाज 'टॉयलेट'ला पळाला, बेन स्टोक्सचा चढलेला पारा; Video Viral

PAK vs ENG : पराभव टाळण्यासाठी पाकिस्तानी फलंदाज 'टॉयलेट'ला पळाला, बेन स्टोक्सचा चढलेला पारा; Video Viral

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

PAK vs ENG 1st Test : इंग्लंडने रावळपिंडी कसोटीत पाकिस्तानचा ७४ धावांनी पराभव केला. पण, हा पराभव टाळण्यासाठी पाकिस्तानी फलंदाजांकडून मैदानावरील संघर्ष अपयशी ठरत असल्याने वेगळाच मार्ग निवडला होता. लाइव्ह मॅच दरम्यान असे काही घडले की ऐकून तुमचे हसू आवरता येणार नाही. पाचव्या दिवसाच्या खेळात अवघ्या काही मिनिटांचा खेळ शिल्लक होता. पाकिस्तान संघातील शेवटची जोडी नसीम शाह आणि मोहम्मद अली क्रीझवर झगडत होती. दुसरीकडे, खराब प्रकाशामुळे खेळ थांबू नये म्हणून इंग्लंड संघाने शक्य तितक्या लवकर षटके टाकण्यावर भर दिला. अम्पायर्सही इंग्लंडला फिरकीपटूंना गोलंदाजीला आणण्यास सांगत होते, कारण वेळ वाया जात होता. 

टीम इंडियाला 'लॉटरी'! इंग्लंडकडून पाकिस्तानने लाज काढून घेतली; आपली वर्ल्ड कप फायनल निश्चित

इंग्लंडने पहिल्या डावात ६५७ धावा केल्या आणि प्रत्युत्तरात पाकिस्तानने ५७९ धावांचे उत्तर दिले.. रावळपिंडी कसोटीच्या पहिल्या दोन दिवसांत सात शतकं झळकल्याने खेळपट्टीवर टीका होऊ लागली. इंग्लंडने दुसरा डाव ७ बाद २६४ धावांवर घोषित करून धाडसी निर्णय घेतला अन् पाकिस्तानसमोर विजयासाठी ३४३ धावांचे लक्ष्य ठेवले. पाकिस्तानकडून कडवी टक्कर मिळताना दिसली आणि ते सामना ड्रॉ च्या दिशेने झुकवत होते. पण, ऑली रॉबिन्सनने दोन धक्के दिले. त्यानंतर नसीम शाह व मोहम्मद अली संघर्ष करत होते. 
पाचव्या दिवसाचा खेळ शिल्लक असताना १३ मिनिटे बाकी होती आणि स्टेडियमवर सर्वांची धाकधुक वाढली होती. बेन स्टोक्सने फिरकीपटू जॅक लिचला गोलंदाजीला आणले आणि त्याने डावातील पहिली विकेट घेतली, जी पाकिस्तानची शेवटची विकेट ठरली. पाकिस्तानचा संपूर्ण संघ २६८ धावांत तंबूत परतला अन् इंग्लंडने ७४ धावांनी सामना जिंकला. 

पाचव्या दिवसाचा खेळ संपायला जास्तीत जास्त ३५ मिनिटे शिल्लक होती. ड्रिंक्स ब्रेक झाला पण तो बराच वेळ खेचला गेला, त्याला कारण पाकिस्तानचा फलंदाज मोहम्मद अली ठनला. इंग्लंडचे खेळाडू मैदानावर त्याची वाट पाहत होते पण मोहम्मद अली टॉयलेट वापरण्यासाठी खेळपट्टीच्या बाहेर होता. वेळ वाया घालवण्यासाठीचा मोहम्मद अलीचा तो प्रयत्न असल्याचे चाहते अंदाज बांधताना दिसले. एका यूजरने लिहिले की, 'मुले मॅच ड्रॉ करण्यासाठी डॉट बॉल खेळतात. दिग्गज सामने ड्रॉ करण्यासाठी बाथरूममध्ये जातात.  

    

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

 

Web Title: PAK vs ENG : Ben Stokes' mercury rises as Pakistani batsman mohammad ali went to the toilet for restroom break to avoid defeat; Video Viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.