Ben Stokes on Babar Azam Droppped from Pakistan squad : इंग्लंडचा कॅप्टन बेन स्टोक्स पुन्हा क्रिकेटच्या मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. मागील ४ कसोटी सामन्याला मुकल्यावर पाकिस्तान विरुद्धच्या मैदानातून तो कमबॅक करणार आहे. त्याच्या अनुपस्थितीत इंग्लंडच्या संघाने पाकिस्तान विरुद्धच्या पहिल्या कसोटीत धमाकेदार विजय नोंदवला होता. आता स्टोक्स परतल्यामुळे संघाची ताकद आणखी वाढली आहे. पण या गोष्टीशिवाय सगळीकडे पाकिस्तान क्रिकेटमध्ये सुरु असलेल्या खेळाची चर्चा रंगत आहे. ज्यावर इंग्लंडच्या कॅप्टननं स्पष्ट अन् थेट मत व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले.
बेन स्टोक्सला विचारण्यात आला होता बाबरसंदर्भातील प्रश्न
इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघाची घोषणा करताना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मोठा निर्णय घेतला. स्टार खेळाडू बाबर आझमसह शाहिन शाह आफ्रिदी आणि नसीम शाह यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. हा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत आहे. यावरून इंग्लंडच्या कॅप्टन बेन स्टोक्सलाही प्रश्न विचारण्यात आला होता. यावर स्टोक्स म्हणाला की, "ही पाकिस्तानची समस्या आहे. माफ करा. पण मला त्याचा काही फरक पडत नाही."
स्टोक्ससह इंग्लंडच्या ताफ्यातून हा गडीही करणार कमबॅक
बेन स्टोक्स स्नायू दुखापतीच्या समस्येमुळे संघाबाहेर होता. पाकिस्तान विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातून तो पुन्हा मैदानात उतरल्याचे पाहायला मिळणार आहे. बेन स्टोक्सशिवाय मॅट पॉट्स हा देखील कमबॅकसाठी तयार आहे. तो ऑगस्टमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यानंतर पुन्हा आपल्या संघाचे प्रतिनिधीत्व करताना दिसेल.
इंग्लंडची मालिकेत १-० अशी आघाडी; पराभवानंतर पाक ताफ्याती मोठी उलथा पालथ
मुल्तानच्या मैदानातील पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या संघाने एक डाव आणि ४७ धावांनी विजय नोंदवत ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. बेन स्टोक्सच्या अनुपस्थितीत ओली पोप इंग्लंड संघाचे नेतृत्व करताना दिसला होता. पहिल्या डावात ५०० पेक्षा अधिक धावा करूनही पाकिस्तानवर पराभवाची नामुष्की ओढावली होती. त्यानंतर पाक संघात मोठा बदल करण्यात आला आहे.
Web Title: PAK vs ENG Ben Stokes reacts to Babar Azam getting dropped He Says It is Pakistan's issue
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.