'पाटा' खेळपट्टीवरही Babar Azam घाट्यात; सेटअप करून Chris Woakes नं घेतली विकेट

पाटा खेळपट्टीवर चांगला प्लॅटफॉर्मे सेट असताना त्याला मोठी खेळी करण्यात अपयश आले.  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 07:54 PM2024-10-07T19:54:06+5:302024-10-07T19:56:28+5:30

whatsapp join usJoin us
PAK vs ENG Chris Woakes Take Wicket Of Babar Azam's You Know he last 50+ score was all the way back in December 2022 | 'पाटा' खेळपट्टीवरही Babar Azam घाट्यात; सेटअप करून Chris Woakes नं घेतली विकेट

'पाटा' खेळपट्टीवरही Babar Azam घाट्यात; सेटअप करून Chris Woakes नं घेतली विकेट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Pakistan vs England, 1st Test, Babar Azam : इंग्लंड विरुद्धच्या मुल्तान कसोटी सामन्यातील पहिला दिवस पाकिस्तानी फलंदाजांनी गाजवला. सलामीवीर अब्दुल शफिकसह कॅप्टन शान मसूद यांनी शतकी खेळी करून प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजांचे खांदे पाडले. गोलंदाजांसाठी अजिबात अनुकूल नसणाऱ्या पाटा खेळपट्टीवर बाबर आझमचा धावांसाठी चालले संघर्ष संपेल असे वाटत होते. पण शेवटी तो पुन्हा स्वस्तात आटोपला. ७१ चेंडूचा सामना केल्यानंत ३० धावांवर तो तंबूत परतला. पाटा खेळपट्टीवर चांगला प्लॅटफॉर्मे सेट असताना त्याला मोठी खेळी करण्यात अपयश आले.  

Chris Woakes नं अगदी सेटअप करून त्याला जाळ्यात अडकवलं

पहिल्या दिवसाच्या खेळात खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल आहे, हे पाकिस्तानची धावसंख्या बघितल्यावर सहज लक्षात येण्याजोगे आहे. पण या परिस्थितीत क्रिस वोक्सनं परफेक्ट सेटअप करून बाबर आझमला आपल्या जाळ्यात अडकवलं. बाबर ज्या चेंडूवर पायचित झाला त्याआधीचा चेंडू वोक्सनं बाहेर काढला त्यानंतर आत चेंडू आणत बाबरला गोंधळात पाडले. तो विकेटसमोर आढळला अन् पायचित होऊन बाबरला तंबूत परतावे लागले. 

 मोठी खेळी सोडा बाबर आझम २०२२ पासून ५० पेक्षा अधिक धावा करु शकलेला नाही. मागील १५ डावातील कामगिरी क्रिकेटरसाठी एक भयावह स्वप्नचं आहे. त्याची खराब कामगिरी पाक संघाच्या अडचणी वाढवणारी आहे. 

  • २७ विरुद्ध न्यूझीलंड, कराची
  • १३ विरुद्ध श्रीलंका, गाले
  • २४ विरुद्ध श्रीलंका, गाले
  • ३९ विरुद्ध श्रीलंका कोलंबो
  • २१ विरुद्ध ऑस्ट्रेलिया, पर्थ
  • १४ विरुद्ध ऑस्ट्रेलिया, पर्थ
  • १ विरुद्ध ऑस्ट्रेलिया, मेलबर्न
  • ४१ विरुद्ध ऑस्ट्रेलिया, मेलबर्न
  • २६ विरुद्ध ऑस्ट्रेलिया, सिडनी 
  • ० विरुद्ध बांगलादेश, रावळपिंडी
  • २२ विरुद्ध बांगलादेश, रावळपिंडी
  • ३१ विरुद्ध बांगलादेश, रावळपिंडी
  • ११ विरुद्ध बांगलादेश, रावळपिंडी
  • ३० विरुद्ध इंग्लंड, मुल्तान

 

दिवस पाकिस्तान संघानं गाजवला, पण बाबरच्या पदरी पुन्हा निराशा

पाकिस्तानच्या संघाने मुल्तान कसोटी सामन्यात पहिल्या दिवसाअखेर  ४ विकेट्सच्या मोबदल्यात ३२८ धावा केल्या होत्या. दिवस पाकिस्तानं गाजवला. पण बाबरच्या पदरी पुन्हा निराशा आली. ७० चेंडू खेळून सेट झाल्यावर त्याने LBW च्या रुपात विकेट गमावली. 

Web Title: PAK vs ENG Chris Woakes Take Wicket Of Babar Azam's You Know he last 50+ score was all the way back in December 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.