PAK vs ENG Final: फायनलमध्ये इंग्लंडने टॉस जिंकला; बाबर आझमला बसला मोठा धक्का, वाचा सविस्तर

आज मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना खेळवला जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2022 01:01 PM2022-11-13T13:01:34+5:302022-11-13T13:02:42+5:30

whatsapp join usJoin us
 PAK vs ENG Final, England has won the toss and decided to bowl first  | PAK vs ENG Final: फायनलमध्ये इंग्लंडने टॉस जिंकला; बाबर आझमला बसला मोठा धक्का, वाचा सविस्तर

PAK vs ENG Final: फायनलमध्ये इंग्लंडने टॉस जिंकला; बाबर आझमला बसला मोठा धक्का, वाचा सविस्तर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मेलबर्न : आज मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना खेळवला जात आहे. पाकिस्तान आणि इंग्लंड (PAK vs ENG) यांच्यातील विजेता संघ विश्वचषकाच्या किताबावर आपले नाव कोरेल. खरं तर आयसीसीला आज आणखी एक असा चॅम्पियन संघ मिळेल, ज्याने या स्पर्धेत दोनवेळा विश्वचषक जिंकला आहे. यापूर्वी केवळ वेस्ट इंडिजच्या संघाने दोनवेळा हा किताब पटकावला आहे. आजच्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हवामानातील बदलामुळे आम्ही पाकिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केल्याचे इंग्लिश संघाचा कर्णधार जोस बटलरने म्हटले आहे. 

आम्हाला देखील नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घ्यायची होती असे पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने म्हटले आहे. त्यामुळे सामन्याच्या पूर्वसंध्येलाच शेजाऱ्यांना मोठा झटका बसल्याचे बोलले जात आहे. 

आजच्या सामन्यासाठी पाकिस्तानचा संघ -
बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, मोहम्मद हारिस, शान मसूद, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम, शाहिन शाह आफ्रिदी, नसीम शाह, हारिस रौफ. 

आजच्या सामन्यासाठी इंग्लंडचा संघ -
जोस बटलर (कर्णधार), लेक्स हेल्स, फिल सॉल्ट, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम करन, ख्रिस वोक्स, ख्रिस जॉर्डन, आदिल राशिद. 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

Web Title:  PAK vs ENG Final, England has won the toss and decided to bowl first 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.