PAK vs ENG: पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा संघ ढेपाळला; इंग्लंडच्या गोलंदाजांनी फोडला घाम!

सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-20 विश्वचषकाचा थरार रंगला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2022 03:36 PM2022-10-17T15:36:08+5:302022-10-17T15:36:17+5:30

whatsapp join usJoin us
PAK vs ENG Live Match Pakistan scored 160 for 8 in 19 overs and set England a target of 161 for victory  | PAK vs ENG: पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा संघ ढेपाळला; इंग्लंडच्या गोलंदाजांनी फोडला घाम!

PAK vs ENG: पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा संघ ढेपाळला; इंग्लंडच्या गोलंदाजांनी फोडला घाम!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ब्रिस्बेन : सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-20 विश्वचषकाचा थरार रंगला आहे. स्पर्धेतील सध्या सराव सामने खेळवले जात असून आता पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यामध्ये सामना पार पडत आहे. विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानच्या संघाची वाईट अवस्था झाली. इंग्लिश गोलंदाजांच्या आक्रमक माऱ्यासमोर पाकिस्तानी फलंदाज गारद झाले. खरं तर पावसाच्या विलंबामुळे सामना 19 षटकांचा खेळवण्यात येत आहे. लक्षणीय बाब म्हणजे पाकिस्तानच्या संघाचा नियमित कर्णधार बाबर आझमला आजच्या सामन्यात विश्रांती दिली असून त्याच्या गैरहजेरीत शादाब खानकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. 

तत्पुर्वी, इंग्लंडने नाणेफेक जिंकून पाकिस्तानच्या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. इंग्लंडच्या संघाने सांघिक खेळी करून पाकिस्तानला 19 षटकांत 8 बाद 160 धावांवर रोखले. पाकिस्तानकडून शान मसूदने सर्वाधिक 39 धावांची खेळी केली. याव्यतिरिक्त हैदर अली (18), शादाब खान (18), इफ्तिखार अहमद (22) आणि मोहम्मद वसीम (26) धावा करून बाद झाला. खरं तर पाकिस्तानच्या संघाची सुरूवात शानदार झाली होती. मात्र संघाच्या 49 धावा असताना पाकिस्तानला हैदर अलीच्या रूपात पहिला झटका बसला. 

इंग्लंडच्या गोलंदाजांनी सांघिक खेळी करून पाकिस्तानवर दबाव टाकला. इंग्लिश संघाकडून डेव्हिड वेलीने सर्वाधिक 2 बळी पटकावले, तर बेन स्टोक्स, सॅम करन, ख्रिस जॉर्डन आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांना प्रत्येकी 1-1 बळी घेण्यात यश आले. डेव्हिड वेलीने आक्रमक खेळी करणाऱ्या शान मसूदला बाद करून पाकिस्तानची फलंदाजी मोडित काढली. 

आगामी सराव सामने खालीलप्रमाणे

19 ऑक्टोंबर -
अफगाणिस्तान विरूद्ध पाकिस्तान 
बागंलादेश विरूद्ध दक्षिण आफ्रिका 
भारत विरूद्ध न्यूझीलंड

टी-20 विश्वचषकात सुपर-12 पूर्वी आठ संघांमध्ये सामने खेळवले जातील. हे आठ संघ दोन गटात आमनेसामने असतील. दोन्ही गटातील अव्वल दोन संघ सुपर-12 सामन्यांसाठी पात्र ठरतील. यामध्ये नामिबिया, श्रीलंका, संयुक्त अरब अमिराती आणि नेदरलँडचे संघ अ गटात खेळतील, तर ब गटात आयर्लंड, स्कॉटलंड, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे हे संघ असतील. 

पहिला राउंड 
अ गट
- नामिबिया, श्रीलंका, संयुक्त अरब अमिराती आणि नेदरलँड.

ब गट - आयर्लंड, स्कॉटलंड, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे. 

सुपर-12 फेरी
गट 1
- अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, अ गटातील विजेता आणि ब गटातील उपविजेता.

गट 2 - बांगलादेश, भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, अ गटातील उपविजेता आणि ब गटातील विजेता. 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: PAK vs ENG Live Match Pakistan scored 160 for 8 in 19 overs and set England a target of 161 for victory 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.