Join us  

Pak vs Eng: ...तर पाकिस्तान एकही चेंडू न टाकताच होणार World Cup मधून 'आऊट'!

इंग्लंडच्या एका निर्णयाने पाकिस्तानचा प्लॅन होऊ शकतो उद्ध्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2023 11:39 AM

Open in App

Pakistan in World Cup 2023 : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये आज कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. उपांत्य फेरीसाठी पात्र ठरण्याची पाकिस्तानची ही शेवटची संधी आहे. मात्र, पाकिस्तान संघ टॉप ४ मध्ये जाण्याची शक्यता जवळपास नगण्य आहे. याचे कारण म्हणजे त्यांना निव्वळ धावगती सुधारण्यासाठी गतविजेत्या इंग्लंडचा मोठ्या फरकाने पराभव करावा लागेल. तो फरक इतका मोठा असायला हवा जे सहसा होणे अशक्य नाही. हा सामना जिंकण्यासाठी पाकिस्तान आपले सर्वस्व पणाला लावेल. पण आज अशीही एक गोष्ट घडू शकते, ज्याने पाकिस्तानचा संघ पहिला चेंडू टाकण्याआधीच स्पर्धेतून बाहेर होऊ शकतो.

एकही चेंडू टाकल्याशिवाय पाकिस्तान बाहेर कसा पडेल?

न्यूझीलंड संघ सध्या ०.७४३ च्या निव्वळ धावगतीने गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. पाकिस्तान 0.036 आणि 8 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. अशा स्थितीत पाकिस्तानला इंग्लंडविरुद्ध केवळ 2 गुणांची गरज नाही तर नेट रनरेटचीही गरज आहे. न्यूझीलंडपेक्षा चांगला नेट रन रेट ठेवण्यासाठी, पाकिस्तानला सुमारे 287 धावांनी विजय मिळवावा लागेल आणि लक्ष्याचा पाठलाग करताना त्यांना 284 चेंडू राखून सामना जिंकावा लागेल. जर पाकिस्तानने प्रथम फलंदाजी केली, तर त्यांना मोठी धावसंख्या उभारण्याची आणि इंग्लंडला लवकर बाद करण्याची संधी आहे. याची शक्यता फार कमी आहे. पण पाकिस्तानने प्रथम गोलंदाजी करायचा निर्णय घेतला तर मात्र पहिला चेंडू टाकण्यापूर्वीच सामना संपेल.

याचे कारण पाकिस्तानला 2.4 षटकांत लक्ष्याचा पाठलाग करावा लागणार आहे. जे जवळपास अशक्य आहे. पाकिस्तानने सामन्यापूर्वी नाणेफेक जिंकली तर त्यांना प्रथम फलंदाजी करायची आहे. पण इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यास पाकिस्तानचा संपूर्ण प्लॅन उद्ध्वस्त होईल. सामन्याचा पहिला चेंडू टाकण्यापूर्वीच पाकिस्तान सामन्यातून जवळपास बाहेर पडेल.

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपपाकिस्तानइंग्लंडन्यूझीलंड