PAK vs ENG Test : इंग्लंडचा संघ तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी पाकिस्तान दौऱ्यावर आहे. येत्या सात तारखेपासून मालिकेला सुरुवात होईल. मागील काही काळापासून संघर्ष करत असलेल्या पाकिस्तानला आपल्या अस्तित्वाची लढाई लढायची आहे. अलीकडेच बांगलादेशने पाकिस्तानात जाऊन त्यांचा करेक्ट कार्यक्रम केला होता. बांगलादेशने २-० ने कसोटी मालिका खिशात घातली. त्यामुळे यजमानांसमोर मोठे आव्हान असेल यात शंका नाही. मात्र, सलामीच्या सामन्याआधी त्यांना दिलासा मिळण्याची दाट शक्यता आहे. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स हाताच्या दुखापतीमुळे पहिल्या सामन्यातून बाहेर होऊ शकतो. दुखापतीमुळे तो ऑगस्टपासून क्रिकेटपासून दूर आहे.
दरम्यान, पाकिस्तान आगामी काळात आपल्या मायदेशात इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. शान मसूदच्या नेतृत्वातील पाकिस्तानी संघाची घोषणा झाली आहे. वन डे विश्वचषक आणि ट्वेंटी-२० विश्वचषकानंतर पाकिस्तानच्या संघामध्ये अनेक बदल पाहायला मिळाले.
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी पाकिस्तानचा संघ -
शान मसूद (कर्णधार), सौद शकील, आमिर जमाल, अब्दुला शफीक, अबरार अहमद, बाबर आझम, मीर हमझा, मोहम्मद हुरैय्या, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, नोमान अली, सैय अयुब, सलमान अली अघा, सर्फराज अहमद, शाहीन शाह आफ्रिदी.
पाकिस्तान दौऱ्यासाठी इंग्लंडचा संघ -
बेन स्टोक्स (कर्णधार), रेहान अहमद, गस एटकिंसन, शोएब बशीर, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, जॉर्डन कॉक्स, जॅक क्रॉली, बेन डकेट, जॅक लीच, ओली पोप, मॅथ्यू पॉट्स, जो रुट, जेमी स्मिथ, ओली स्टोन आणि ख्रिस वोक्स.
PAK vs ENG मालिकेचे वेळापत्रक
७-११ ऑक्टोबर, मुल्तान
१५-१९ ऑक्टोबर, मुल्तान
२४-२८ ऑक्टोबर, रावळपिंडी
Web Title: PAK vs ENG Test England captain Ben Stokes is likely to be ruled out of the first match due to injury
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.