PAK vs ENG Test : पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडने आपल्या संघाची घोषणा केली आहे. इंग्लंडचा संघ तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी पाकिस्तान दौऱ्यावर आहे. येत्या सात तारखेपासून मालिकेला सुरुवात होत आहे. मागील काही काळापासून संघर्ष करत असलेल्या पाकिस्तानला आपल्या अस्तित्वाची लढाई लढायची आहे. अलीकडेच बांगलादेशने पाकिस्तानात जाऊन त्यांचा करेक्ट कार्यक्रम केला होता. बांगलादेशने २-० ने कसोटी मालिका खिशात घातली. त्यामुळे यजमानांसमोर मोठे आव्हान असेल यात शंका नाही. मात्र, सलामीच्या सामन्याआधी पाकिस्तानला मोठा दिलासा मिळाला आहे. कारण इंग्लंड पहिल्या सामन्यात नवनिर्वाचित कर्णधाराच्या नेतृत्वात असेल.
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स हाताच्या दुखापतीमुळे पहिल्या सामन्यातून बाहेर झाला आहे. त्यामुळे ओली पोपवर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. खरे तर स्टोक्स दुखापतीमुळे तो ऑगस्टपासून क्रिकेटपासून दूर आहे. याशिवाय ब्रायडन कार्स सलामीच्या सामन्यातून इंग्लंडच्या संघात पदार्पण करेल.
इंग्लंडची प्लेइंग XIओली पोप (कर्णधार), बेन डकेट, जॅक क्रॉली, जो रुट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ, ख्रिस वोक्स, गस एटकिंसन, ब्रायडन कार्स (पदार्पण), जॅक लीच, शोएब बशीर.
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी पाकिस्तानचा संघ -शान मसूद (कर्णधार), सौद शकील, आमिर जमाल, अब्दुला शफीक, अबरार अहमद, बाबर आझम, मीर हमझा, मोहम्मद हुरैय्या, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, नोमान अली, सैय अयुब, सलमान अली अघा, सर्फराज अहमद, शाहीन शाह आफ्रिदी.
PAK vs ENG मालिकेचे वेळापत्रक ७-११ ऑक्टोबर, मुल्तान१५-१९ ऑक्टोबर, मुल्तान२४-२८ ऑक्टोबर, रावळपिंडी