Join us  

PAK vs ENG : इंग्लंडचा स्टार खेळाडू दुसऱ्या कसोटीला मुकण्याची शक्यता; 'या' कारणामुळे मायदेशी परतणार

PAK vs ENG Test Series : सात तारखेपासून पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2024 4:20 PM

Open in App

pak vs eng 2nd test match updates : इंग्लंडचा संघ तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी पाकिस्तान दौऱ्यावर आहे. सात तारखेपासून सलामीच्या सामन्याला सुरुवात झाली आहे. बेन स्टोक्स दुखापतीमुळे खेळू शकला नाही. त्यामुळे ओली पोप इंग्लिश संघाचे नेतृत्व करत आहे. खरे तर दुसऱ्या कसोटी सामन्यातून ओली स्टोन बाहेर होऊ शकतो. त्याला सलामीच्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही. आठवड्याच्या अखेरीस तो मायदेशी परतू शकतो. ओली स्टोन विवाहबंधनात अडकणार असल्याने त्याला इंग्लंडमध्ये परतावे लागेल, अशी माहिती टाइम्स ऑफ इंडियाने दिली. 

सध्या पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात पहिला कसोटी सामना खेळवला जात आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना यजमान पाकिस्तानच्या फलंदाजांनी सांघिक कामगिरी केली. पाकिस्तानकडून शान मसूदने सर्वाधिक १५१ धावांची खेळी केली, तर अब्दुला शफीक (१०२), सैय अयुब (४), बाबर आझम (३०), सौद शकील (८२), नसीम शाह (३३), मोहम्मद रिझवान (०) आणि अघा सलमानने शतकी खेळी केली.

पहिल्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ -ओली पोप (कर्णधार), बेन डकेट, जॅक क्रॉली, जो रुट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ, ख्रिस वोक्स, गस एटकिंसन, ब्रायडन कार्स (पदार्पण), जॅक लीच, शोएब बशीर. 

पाकिस्तानचा संघ - शान मसूद (कर्णधार), सैय अयुब, अब्दुला शफीक, बाबर आझम, सौद शकील, नसीम शाह, मोहम्मद रिझवान, अघा सलमान, आमिर जमाल, शाहीन शाह आफ्रिदी, अबरार अहमद. 

PAK vs ENG मालिकेचे वेळापत्रक ७-११ ऑक्टोबर, मुल्तान१५-१९ ऑक्टोबर, मुल्तान२४-२८ ऑक्टोबर, रावळपिंडी  

टॅग्स :पाकिस्तानइंग्लंड