PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! PCB ने दुसऱ्या सामन्याचे ठिकाण बदलले; कारण जुनेच सांगितले

Revised schedule of England’s red-ball tour of Pakistan : पाकिस्तान आगामी काळात आपल्या मायदेशात इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 05:25 PM2024-09-20T17:25:21+5:302024-09-20T17:29:17+5:30

whatsapp join usJoin us
pak vs eng test series Pakistan vs England second Test shifted from Karachi to Multan, read here details  | PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! PCB ने दुसऱ्या सामन्याचे ठिकाण बदलले; कारण जुनेच सांगितले

PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! PCB ने दुसऱ्या सामन्याचे ठिकाण बदलले; कारण जुनेच सांगितले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

PAK vs ENG Test Series : सात ऑक्टोबरपासून पाकिस्तान आपल्या मायदेशात इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्याचे ठिकाण बदलण्यात आले असून, आता ही लढत कराचीत होणार नसून मुल्तान येथे पार पडेल. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, १५ ते १९ ऑक्टोबरदरम्यान मुल्तान येथे दुसरा कसोटी सामना खेळवला जाईल. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. आयसीसीची मोठी स्पर्धा पाकिस्तानात होणार असल्याने पीसीबीने स्टेडियमच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. विशेष बाब म्हणजे या आधी देखील पीसीबीने स्टेडियमच्या दुरुस्तीचे कारण सांगून कराची येथे सामने खेळवले नव्हते. 

कराची स्टेडियमचा विकास करण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. म्हणून पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा सामना कराची येथे खेळवला जाणार नाही. लाहोर येथील गद्दाफी स्टेडियम आणि रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर देखील चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने खेळवले जातील. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे डायरेक्टर उस्मान वाहला यांनी एका निवेदनाद्वारे म्हटले की, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड इंग्लंडच्या पुरुष क्रिकेट संघाचे पाकिस्तानात स्वागत करण्यासाठी सज्ज आहे. आगामी मालिका संस्मरणीय करण्यासाठी आम्ही आतुर आहोत. ही अत्यंत स्पर्धात्मक मालिका होईल असा विश्वास आहे. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानला आपल्या मायदेशात बांगलादेशकडून कसोटी मालिकेत पराभव स्वीकारावा लागला. दोन सामन्यांच्या या मालिकेत बांगलादेशने २-० असा ऐतिहासिक विजय मिळवला. मागील अनेक वर्षांपासून पाकिस्तान आपल्या घरात कसोटी सामना जिंकण्याच्या प्रतीक्षेत आहे. पाकिस्तानला मागील जवळपास तीन वर्षांपासून आपल्या घरात एकही विजय मिळवता आला नाही. शान मसूदला कर्णधारपद सोपवल्यानंतर पाकिस्तानने ऑस्ट्रेलिया दौरा केला आणि तिथेही त्यांना जबर मार खावा लागला. बांगलादेशविरुद्धच्या पराभवामुळे WTC च्या शर्यतीत कायम राहणे शेजाऱ्यांना कठीण झाले आहे. वन डे, ट्वेंटी-२० आणि कसोटी सर्वच फॉरमॅटमध्ये पाकिस्तानची 'कसोटी' पाहायला मिळत आहे. 

PAK vs ENG मालिकेचे वेळापत्रक 

  1. ७-११ ऑक्टोबर, मुल्तान
  2. १५-१९ ऑक्टोबर, मुल्तान
  3. २४-२८ ऑक्टोबर, रावळपिंडी

Web Title: pak vs eng test series Pakistan vs England second Test shifted from Karachi to Multan, read here details 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.