PAK vs ENG : उत्कंठावर्धक ठरलेल्या रावळपिंडी कसोटीत इंग्लंडने विजय मिळवला.... २२ वर्षांनंतर इंग्लंडनेपाकिस्तानमध्ये कसोटी सामना जिंकला... काल लोकेश राहुलने सोडलेला झेल भारताला किती महागात पडला, हे सर्वांनी पाहिले. आजही इंग्लंडच्या बाबतीत तशी परिस्थिती उद्भवली होत... अखेरची विकेट मैदानावर असताना यष्टिरक्षक ऑली पोप व स्लीपमध्ये उभ्या असलेल्या जो रूट यांच्यात 'पेहेले आप' च्या नादात झेल सुटला.. दोघांच्या मधून चेंडू सीमारेषेपार केला... पाकिस्तान ही लढत ड्रॉ सोडवतेय असा आत्मविश्वास रावळपिंडी स्टेडियमवर उपस्थित सर्व चाहत्यांमध्ये निर्माण झाला अन् पाकिस्तानच्या जयघोषाने मैदान दुमदुमले.... इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सला अम्पायर पटापट षटकं फेकण्यास सांगत होते आणि तितक्यात त्याने जॅक लीचला गोलंदाजीला आणले... त्याने नसीम शाहला LBW केले आणि इंग्लंडने ऐतिहासिक विजय मिळवला...
इंग्लंडने पहिल्या डावात ६५७ धावा केल्या आणि प्रत्युत्तरात पाकिस्तानने ५७९ धावांचे उत्तर दिले.. रावळपिंडी कसोटीच्या पहिल्या दोन दिवसांत सात शतकं झळकल्याने खेळपट्टीवर टीका होऊ लागली. इंग्लंडने दुसरा डाव ७ बाद २६४ धावांवर घोषित करून धाडसी निर्णय घेतला अन् पाकिस्तानसमोर विजयासाठी ३४३ धावांचे लक्ष्य ठेवले. पाकिस्तानकडून कडवी टक्कर मिळताना दिसली आणि ते सामना ड्रॉ च्या दिशेने झुकवत होते. पण, ऑली रॉबिन्सनने दोन धक्के दिले. त्यानंतर नसीम शाह व मोहम्मद अली संघर्ष करत होते. पाचव्या दिवसाचा खेळ शिल्लक असताना १३ मिनिटे बाकी होती आणि स्टेडियमवर सर्वांची धाकधुक वाढली होती. बेन स्टोक्सने फिरकीपटू जॅक लिचला गोलंदाजीला आणले आणि त्याने डावातील पहिली विकेट घेतली, जी पाकिस्तानची शेवटची विकेट ठरली. पाकिस्तानचा संपूर्ण संघ २६८ धावांत तंबूत परतला अन् इंग्लंडने ७४ धावांनी सामना जिंकला.
हॅरीस रॉफची माघार...
पाकिस्तानच्या या पराभवानंतर गोलंदाज हॅरीस रौफ ( Haris Rauf) याने दुसऱ्या कसोटीतून माघार घेतली. २९ वर्षीय हॅरीस संपूर्ण मालिकेला मुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रावळपिंडीत कसोटीतून पदार्पण करणाऱ्या हॅरीस रौफला दुखापत झाली आणि त्याला MRI स्कॅनसाठी पाठवले गेले. तो मैदानावर क्षेत्ररक्षणासाठी आला नाही, परंतु त्याला फलंदाजीला यावे लागले आण त्यातही तो शून्यावर बाद झाला. त्याने १३ षटकांत ७८ धावा दिल्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: PAK vs ENG : The winning moment ! England Defeat Pakistan By 74 Runs In Final Day Thriller; Haris Rauf ruled out of Multan Test against England, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.