पाकिस्तानी संघ ट्वेंटी-२० विश्वचषकाच्या आधी आयर्लंड आणि इंग्लंडविरूद्ध मालिका खेळणार आहे. शेजाऱ्यांची ट्वेंटी-२० विश्वचषकाच्या दृष्टीने ही तयारी असणार आहे. पण, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुन्हा परतलेला पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर आयर्लंडविरूद्धच्या मालिकेतील पहिल्या काही सामन्यांना मुकणार आहे. व्हिसा नसल्यामुळे तो आयर्लंडला वेळेत जाऊ शकणार नाही. फिक्सिंग प्रकरणी दोषी आढलेल्या आमिरवर आयसीसीने कारवाई केली होती. त्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केले होते.
पण, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेले मोहम्मद आमिर आणि इमाद वसीम हे पुन्हा एकदा पाकिस्तानी संघात परतले आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी आपला राजीनामा परत केला. २०१८ मध्ये देखील आमिरला व्हिसा मिळाला नव्हता. आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यावर जाण्यासाठी आमिरला वेळेत व्हिसा न मिळाल्याने तो काही सामन्यांना मुकला होता.
आयर्लंड विरूद्ध पाकिस्तान मालिकेचे वेळापत्रक
१० मे - पहिला ट्वेंटी-२० सामना
१२ मे - दुसरा ट्वेंटी-२० सामना
१४ मे - तिसरा ट्वेंटी-२० सामना
(सर्व सामने Clontarf येथे होतील)
आयर्लंड आणि इंग्लंड मालिकेसाठी पाकिस्तान संघ -
बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, सैम अयुब, फखर जमान, इरफान खान नियाझी, इफ्तिखार अहमद, उस्मान खान, आझम खान, शादाब खान, इमाद वसीम, शाहीन शाह आफ्रिदी, मोहम्मद आमिर, नसीम शाह, हारिस रौफ, अब्बास आफ्रिदी, अबरार अहमद, हसन अली, सलमान अली आगा.
पाकिस्तानचा इंग्लंड दौरा
२२ मे - पहिला ट्वेंटी-२० सामना
२५ मे - दुसरा ट्वेंटी-२० सामना
२८ मे - तिसरा ट्वेंटी-२० सामना
३० मे - चौथा ट्वेंटी-२० सामना
Web Title: pak vs ire t20 series Pakistan hit by Mohammad Amir visa delay for Ireland, read here details
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.