PAK vs NEP Asia Cup 2023 Live Marathi : आशिया चषक स्पर्धा पूर्णपणे पाकिस्तानात होत नाहीए, हेच चांगले झाले. अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. BCCI ने भारतीय संघ कोणत्याच परिस्थितीत पाकिस्तानात आशिया चषक खेळण्यासाठी येणार नाही, हे ठणकावून सांगितले. त्यामुळे यजमान पाकिस्तानला हायब्रिड मॉडेलनुसार आशिया चषकाचे आयोजन करावे लागले. त्यानुसार ४ सामने पाकिस्तानात व भारताच्या सर्व सामन्यांसह ९ लढती श्रीलंकेत होणार आहे. आज पाकिस्तान वि. नेपाळ लढतीने आशिया चषकाला सुरुवात झाली. १५ वर्षांनी आशिया चषक पाकिस्तानात होणार असल्याने गर्दी ओसंडून वाहील, असा दावा केला जात होता. पण, चित्र काही वेगळेच दिसले. मुल्तानचे स्टेडियम रिकामी दिसले अन् नेटिझन्सने PCBला ट्रोल केले.
'चोरी' महागात पडली, रोहितच्या एका 'थ्रो' ने नंबर १ पाकिस्तानची गोची केली! नेपाळ पडला भारी
पाकिस्तानने नाणेफेक जिंकून नेपाळ विरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नेपाळचा गोलंदाज करण केसीने ईंगा दाखवला आणि फखर जमान ( १४) यष्टिरक्षक आसीफ शेखच्या हाती झेल देऊन परतला. सातव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर १ धाव चोरण्याचा प्रयत्न पाकिस्तानला महागात पडला..कर्णधार रोहित पौडेलने वेगवान थ्रो करून इमामला ( ५) रन आऊट केले. पाकिस्तानचे दोन्ही सलामीवीर २५ धावांत तंबूत परतले होते. कर्णधार बाबर आजम व मोहम्मद रिझवान यांनी डाव सावरला, परंतु नेपाळच्या लयबद्ध गोलंदाजीने धावांचा ओघ आटवला होता. पाकिस्तानच्या २२ षटकांत २ बाद १०२ धावा झाल्या आहेत.